Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मराठा आरक्षणसंदर्भात उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मराठा आरक्षणसंदर्भात उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Related Story

- Advertisement -

भाजपाचे खासदार आणि नेते उदयनराजे भोसले यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटी घेतली आहे. मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मराठा आरक्षणासंदर्भातील एक निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. ( maratha reservation ) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापूर्वीही उदयनराजेंनी( udayanraje bhosale ) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. ( sharad pawar ) मराठा आरक्षण निर्णयासंदर्भात निर्णय घेताना होत असलेली दिरंगाई पाहता मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालण्याची विनंती उदयराजेंनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयात होत असलेला वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा रोखण्यासाठी राज्य सरकारने जातीने लक्ष घालत हा विषय मार्गी लावावा असे आवहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणसंबंधी काही मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढण्यास राज्य सरकारला भाग पाडावे, जेणेकरुन समाजान निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असं आवाहन उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

एसईबीसी उमेदवाराने ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातील केसवर काय परिणाम होऊन शकतो. तसेच जर मोठ्याप्रमाणात ईडब्ल्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याला केसवर कितपत परिणाम जाणवेल. याचबरोबर ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करण्यासंदर्भात काही ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काय फटका बसेल असे यांसारख्या मुद्द्यावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढाव्यात. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालायातील प्रलंबित खटल्यांसंबंधी जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून वकिलांना काय निर्देश देण्यात आले याचा खुलासा होईल. असे मत उदयनराजेंनी या निवेदनात मांडले आहे.

- Advertisement -

तसेच एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करुन त्यांना नोकरीत का सामावून घेत नाहीत? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट दरम्यान उदयनराजेंनी कोर्टात सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणाच्या योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावर वडिलकीच्या नात्याने लक्ष घालावं, अशी मागणी केली होती.


हेही वाचा- Pooja Chavan Suicide Case: पोलिसांनी घेतले दोन जणांना ताब्यात

 

- Advertisement -