घरताज्या घडामोडीमोठी बातमी: दोन कट्टर विरोधक राजेंची भेट, एकमेकांना म्हणाले 'टेक केअर!'

मोठी बातमी: दोन कट्टर विरोधक राजेंची भेट, एकमेकांना म्हणाले ‘टेक केअर!’

Subscribe

राजकारणात एकमेकांचे हाडवैरी कधी एकमेकांना मिठी मारतील याचा काहीच नेम नाही. म्हणजे राजकारणालाच काही नेम किंवा नियम नाही. राजकारणात कधीच कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो, हे तत्त्व त्रिकालबाधित सत्य असल्याची उदाहरणे वारंवार मिळत राहतात. सातारा जिल्ह्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबतही काही दिवसांपर्यंत असेच होते. दोघेही एकमेकांना चौरचौघात बोलायला कमी करत नव्हते. मात्र सातारा येथे शनिवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. एरवी गेस्ट हाऊसवर हमरीतुमरीवर आलेले हे दोन राजे एकमेकांशी मनसोक्त गप्ता मारताना, हास्यविनोद करताना दिसले. दोघांच्या या हितगुजामुळे सातारकरांना मात्र प्रचंड आनंद झाला असेल.

सातारा विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय? असे विचारले. त्यावेळी रामराजे साहेब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजे गाडीतून उतरले आणि थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले. दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या आणि कोरोनाच्या काळात तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला एकमेकांना दिला. विश्रामगृहावर उपस्थित असलेल्या राजेंच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, राजेंचे मनोमिलन झाले असून ते एकमेकांना ‘टेक केअर’ म्हणाले.

- Advertisement -

रामराजे नाईक निंबाळकर हे फलटनच्या निंबाळकर राजघराण्याचे १३ वशंज आहेत. तर उदयनराजे भोसले हे छत्रपतींच्या सातारा गादीचे १३ वे वशंज आहेत. दोन्ही नेत्यांना शिवसेना पक्षाची पार्श्वभूमी आहे. त्यानंतर दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र नांदत होते. मात्र जिल्ह्यावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात दोन्ही राजेंमध्ये अनेकदा खटके उडालेले पाहायला मिळाले. खासदार शरद पवारांनी अनेकदा उदयनराजेंच्या स्वभावाकडे कानाडोळा करत त्यांना खासदारकीसाठी तिकीट दिले. तर रामराजेंना शरद पवारांची ही भूमिका खुपत असे. त्यातून अनेकदा दोन्ही राजेंमध्ये जाहीर संघर्ष बघायला मिळाला. मुंबईतील पक्ष कार्यालयात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तर दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवार यांच्यासमोरच शाब्दिक चकमक झाली होती.

udayanraje and ramraje 2019 photo

- Advertisement -

२३ मार्च २०१९ रोजी देखील एका पत्रकार परिषदेनिमित्त दोन्ही राजेंची भेट झाली होती. मात्र त्यानंतर त्यांच्यात बरेच खटके उडालेले पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन जेव्हा उदयनराजे भाजपकडून निवडणूक लढवत होते, तेव्हातर रामराजेंनी उदयनराजेंचा पराभव करण्याचा विडाच उचलला होता. आता मात्र दोन्ही राजेंचे अचानक मनोमलन झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सातारच्या राजकारणा नवी कलाटणी मिळणार का? असाही कयास बांधला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -