घरमहाराष्ट्रनुपूर शर्मांवर जशी कारवाई झाली तशी राज्यपालांवर व्हावी; उदयनराजे भोसलेंची मागणी

नुपूर शर्मांवर जशी कारवाई झाली तशी राज्यपालांवर व्हावी; उदयनराजे भोसलेंची मागणी

Subscribe

नुपूर शर्मांवर जशी कारवाई झाली तशी कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आज पुणे बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आज पुण्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, काही वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. या पुणे बंदमध्ये भाजप, मनसे वगळता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसनेही सहभाग घेतला होता. यात अनेकांनी मूक मोर्चा करत आपला निषेध व्यक्त केला. या मोर्चाला भाजपचा पाठींबा नसतानाही भाजपचे खासदार उदयनराजे यांनी या मोर्चात सहभाग घेतला, या पुण्यातील मोर्चातून त्यांनी छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लोकांच्या मनात साडेतीनशे वर्षांनंतरही प्रेम कायम आहे. महाराजांपुढे पक्ष दुय्यम आहेत. मात्र आता त्यांचा सन्मान व्हावा हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली हीच खरी शोकांतिका असल्याची खंत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

यावेळी त्यांनी राज्यपालांबाबत तातडीने भूमिका घ्यायला हवी अशी मागणी देखील यांनी केली आहे. नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपालांना का हटवले नाही, राज्यापालांना तोच न्याय का नाही असा थेट सवालही खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानस्पद वक्तव्याप्रकरणी आज सर्व पक्षांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यात राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या विधानाचाही जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. पुण्यातील डेक्कन ते लाल महालपर्यंत हा मोर्चा असणार आहे. पुण्यातील व्यापारी संघटना आणि विविध संघटनांनीही या बंदला पाठींबा दिला आहे. त्यामुळे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरासह अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यातील पीएमपीएल बस सेवा, भाजीपाला, फुल मार्केट बंद आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, यांनी पुणे बंदला पाठिंबा जाहीर दिला आहे.


भारत-चीन सीमावादावर राजकारण बंद करा; अमित शाह काँग्रेसवर भडकले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -