घरमहाराष्ट्रशिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आंबेडकरांच्या हातून घडलं; उदयनराजेंचे प्रतिपादन

शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आंबेडकरांच्या हातून घडलं; उदयनराजेंचे प्रतिपादन

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. भारतासह जगभरातून त्यांना विविध माध्यमांतून अभिवादन केले आहे. यात अनेक राज्यकर्त्यांना मुंबईच्या दादर चैत्यभूमीवर येत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यात भाजपचे खासदार उदयनराजे देखील मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून त्यानी नंतर चैत्यभूमीवर भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त उदयराजेंनी चैत्यभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांवा छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्वधर्म समभावाचा विचार त्यांनी घटना लिहून लोकांपर्यंत पोहवण्याचे पुण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून घडलं. असं प्रतिपादन उदयनराजे यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना उदनराजे म्हणाले की, महाड सत्याग्रहाचाही आवर्जुन इथे उल्लेख करावासा वाटतो. त्यावेळी सुद्धा सर्व धर्माचे लोकं एकसारखे आणि बरोबरीचे आहे हे त्यातून पाहायला मिळाले. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण हे साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कुलमध्ये झाले, उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहु महाराज, गायकवाड महाराज यांनी बाबासाहेबांमध्ये एक अष्टपैलू व्यक्तीमत्व पाहिलं, त्यातून त्यांनी बाबासाहेबांना मोठ्याप्रमाणात प्रोत्साहन दिलं.

- Advertisement -

आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देशाची घटना याचा विचार केलास खूप बारकावे त्या राज्यघटनेत आहेत. मुलभूत अधिकार असतील, यात इतर देशांची राज्यघटना आणि आपल्या देशाची घटना पाहिली तर अनेक बारकाव्यांचा उल्लेख त्यांनी आपल्या राज्यघटनेत केला आहे. असंही उदयनराजे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी दादर चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत.


बेळगावातील आंदोलनावर महाराष्ट्रातील नेते म्हणतात…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -