घरताज्या घडामोडीराज्यपालांविरोधातील आंदोलनात शिवप्रेमींना एकत्र येण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन, उदयनराजे म्हणतात...

राज्यपालांविरोधातील आंदोलनात शिवप्रेमींना एकत्र येण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन, उदयनराजे म्हणतात…

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत आहे. त्यामुळे स्वाभाविकच ज्यांना शिवरायांची आस्था आहे, ते आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांचे काही चुकत नाही, ते योग्यच करत आहेत, अशा शब्दांत भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. (BJP MP Udayanraje Bhosale talk on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवप्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन केले असता तुम्ही या आंदोलनात सहभागी होणार का, असा सवाल एका माध्यम प्रतिनिधीने विचारला. त्यावर त्यांनी “महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत आहे. त्यामुळे स्वाभाविकच ज्यांना शिवरायांची आस्था आहे, ते आंदोलन करत आहेत. त्यामुळे ते योग्यच करत आहेत”, असे उत्तर दिले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचे आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सर्व शिवप्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र बंदची हाकही दिली होती. दरम्यान, येत्या १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात हे आंदोलन असणार आहे.

- Advertisement -

‘मविआ’च्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी महाविकास आघाडीची पाठराखण केल्याचे दिसले. यावेळी उदयनराजे म्हणाले की, “महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान पाहता काही शिवभक्त आहेत. जे एकत्र येत आहेत. तसेच, मविआच्या आंदोलनाकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणे चुकीचे आहे. तसेच, हा विषय कोणत्या एका पक्षाचा नाही. मात्र सातत्याने शिवरायांचा होत असलेल्या अपमानामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्त नाराज आहेत. तसेच, शिवरायांचा वारंवार होणाऱ्या अपमानावरून असे वाटायला नको की, हे चालते महाराष्ट्रात, त्यामुळे याला कुठेतरी रोख लागला पाहिजे. तसेच, याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे”.


हेही वाचा – राज्यपालांविरोधात उदयनराजे भोसले आणखी आक्रमक; थेट पंतप्रधानांनाच पाठवलं पत्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -