…तर तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर पलटवार

शिवसनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करण्यात आला. "शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे.

Ashish Shelar

शिवसनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करण्यात आला. “शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत”, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा”, अशा शब्दांत शेलारांनी पलटवार केला आहे. (BJP mumbai chief ashish shelar slams shiv sena by letter)

सामनाच्या अग्रलेखातील टीकेनंतर आशिष शेलार यांनी एक पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. या पत्रात आशिष शेलार यांनी “दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता… पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सर्त्तेत कोण बसले?”, असे सवाल उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली आहे.

आशिष शेलारांचे पत्र

फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा !

दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता… पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सर्त्तेत कोण बसले?

फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा

हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय?

मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट !

महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले… तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले..? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे… आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार ? कि आणखी त्याच्यापण पुढे ?

हे मिशन नव्हे “कमिशन”

कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले… बंधू” राजांनी वेगळी चूल मांडली. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले… वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.

हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले.. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच… स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय?

नाचता येईना अंगण वाकडे!

स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे!

सामना अग्रलेखातील टीका

शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!


हेही वाचा – फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होते; सामना अग्रलेखातून भाजपवर टीका