भाजपने मित्र पक्षांना धोका दिला नाही; बिहार राजकारणावरून फडणवीसांनी शिवसेनेवर साधला निशाणा

Dcm devendra fadanvis thank to vedanta group chairman anil agarwal and slams shivsena congress ncp mahavikas aghadi govt on Vedanta Foxconn Deal row

राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो. अशी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप झाला आहे. याच राजकीय भूकंपात बिहारमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुशील कुमार यांनी शिवसेनावर जहरी टीका केली. आम्हाला ज्यांनी धोका दिला त्यांना आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आम्हाला धोका दिला त्याचे परिणाम त्यांना आता भोगावे लागत आहेत, असा आरोप त्यांनी केला. एकूणच बिहारमध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

खाते वाटपाबाबत चर्चा; पण उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात…

बिहारमध्ये भाजपचे 75 लोकं निवडणूक आले आणि जेडीयूचे 42 लोकं निवडूण आले तरी नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप कधी मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात त्यावेळी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसले, त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आले. अशी टीका फडणवसींना केली.

दरम्यान बिहार राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. नितीशकुमार बिहारचे लोकमान्य नेते आहेत. महाराष्ट्रातील चित्र बिहारमध्ये दिसेल असे वाटल्याने नितीशकुमार यांनी सावध भूमिका घेत भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी टाकलेले हे पाऊल शहाणपणाचे आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

शिवसेना आणि शिंदे गटात शिलसेनेतच्या चिन्हावरून वाद सुरू आहे. यावर बोलताना पवारांनी, मी काँग्रेसमधून बाहेर पडताना, पक्ष आणि चिन्ह दोन्ही बदलले होते, असं म्हणत भाजपला टोला लगावला. ज्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की ज्यावेळी शरद पवार यांनी पक्ष बदलला त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्थितवात नव्हता. मात्र, आता तसे कायदे अस्तित्वात आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागते. हीच कायदेशील लढाई एकनाथ शिंदे आणि शिवसेनत सुरु आहे.


शरद पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर