घरताज्या घडामोडीदेश तुमच्या *** माल आहे का? निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका

देश तुमच्या *** माल आहे का? निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत निलेश राणे यांनी टीका केली आहे. (BJP Nilesh Rane Slams Congress leader Sonia Gandhi and Rahul Gandhi)

नेमके काय म्हणाले निलेश राणे?

- Advertisement -

निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “2009 ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. AICC व IYC ऑफिस शासकीय बंगल्यात आहेत. सोनिया गांधी ज्या घरात राहतात ते घर भारताच्या पंतप्रधानांकडे असलं पाहिजे पण त्या आजही तिथे राहतात”, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच, देश तुमच्या बा** माल आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सूरतमधील एका न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं सभासदत्व रद्द केलं होतं. तसेच राहुल गांधींचं सबासदत्व रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना पत्र पाठवून २२ एप्रिल पर्यंत सरकारी बंगला रिकामी करण्याची सूचना दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – ‘त्या’ प्रकरणी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे व संजय राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -