घरताज्या घडामोडीभाजपशी युती बाळासाहेबांनी जपली, उद्धव ठाकरें तेव्हा कॅमेरा घेऊन फिरत होते, निलेश...

भाजपशी युती बाळासाहेबांनी जपली, उद्धव ठाकरें तेव्हा कॅमेरा घेऊन फिरत होते, निलेश राणेंचा पलटवार

Subscribe

राजकारणात आम्ही इन्क्युबेशन सेंटर म्हणजेच उबवणी केंद्र उघडले होते. परंतु आम्ही नको ती अंडी उबवली असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणै दौऱ्यात एका कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता हा भाजपला टोला लगावला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही नको ती अंडी उबवली त्याचे पुढे काय झाले तुम्ही बघता आहात असे वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर निलेश राणेंनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पलटवार केला आहे. मुख्यमंत्री काय बोलतात हे कळण्यासाठी ट्रान्सलेटरची गरज लागते. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. २५ वर्षे बाळासाहेबांनी युती जपली, त्यावेळी १९९५ पर्यंत उद्धव ठाकरे जंगलात कॅमेरा घेऊन फिरत होते. त्यावेळी ते राजाकारणात कुठेच नव्हते. त्यांचा संबंध कुठेच नव्हता मग भाजपशी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

- Advertisement -

फडणवीसांकडून बोलण्याचे ट्रेनिंग घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखे बोललं पाहिजे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोलण्याचे ट्रेनिंग घेतलं पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून घेणार नाहीत म्हणून फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्या आणि २५ वर्षे अंडी उबली त्यावर भाष्य करा असे निलेश राणे म्हणाले आहेत. तर आगामी निवडणुकीमध्ये जनतेला तुम्हाला फक्त अंडी उबवण्यासाठी ठेवलं आहे हे कळेल असा खोचक टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.

विनायक राऊत बालावाडीत

मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरुन खासदार विनायक राऊत यांच्यावरही निलेश राणेंनी घणाघात केला आहे. विनायक राऊत यांना मेडिकल कॉलेज म्हणजे काय हे विचारा त्यांना ते डिस्पेंसरी वाटते. आमच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव अनेकवेळा रिजेक्ट केलं आहे. भाजपमध्ये आल्यावरही रिजेक्ट झालं आहे. विनायक राऊत यांना मेडिकल कॉलेजमध्ये काय पाहिजे माहिती नाही. ते अजून बालवाडीत आहेत. त्यांनी नारायण राणेंकडे येऊन माहिती घ्यावी त्यांच्याकडून नसेल घ्यायची तर माझ्याकडे यावे मी समजावून सांगेल आणि जर तरीही कळाले नाही तर मग त्यांनी वेगळा व्यक्ती नियुक्त करावा मग त्यांचे कॉलेज होईल असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सात दिवसांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर! आज कोणतीही दरवाढ नाही

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -