Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Maharashtra Assembly Budget Session 2021: अन् भाजप आमदार सभागृहातच करू लागले म्याव...

Maharashtra Assembly Budget Session 2021: अन् भाजप आमदार सभागृहातच करू लागले म्याव म्याव

Related Story

- Advertisement -

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session 2021) १ मार्चपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज विरोधक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलं. याचमुद्द्यावरून यावेळी आमदार अबू आझमी यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधला. दरम्यान, सभागृहात बसलेल्या भाजपच्या आमदारांकडून म्याव म्याव असा आवाज आला. विशेष म्हणजे समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले होते. त्यामुळे भाजप आमदारांचं हे म्याव म्याव नेमकं कुणाला होतं असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुस्लिम अरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांच्यावर निशाणा साधला. संविधानाप्रमाणे मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही हे मी सत्तेत असताना म्हणालो होतो. मात्र तेव्हा अबू आझमी आंदोलन करायचे. मात्र आता त्यांचं आंदोलन बंद झालं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. याच दरम्यान मागे गॅलरीत बसलेल्या भाजप आमदारांनी म्याव म्याव असा आवाज काढला. मात्र, अबू आझमी हे सभागृहात उपस्थित नव्हते.

- Advertisement -

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा समाजवादी घटक पक्ष आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचं मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी यासाठी फलक घेऊन विधिमंडळ परिसरात घोषणा दिल्या. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात प्रस्ताव आणण्याची मागणी देखील त्यांनी केली. प्रस्ताव न आणल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी दिला. भाजपला हरवायचं होतं म्हणून आम्ही महाविकास आघाडीला साथ दिली, असं अबू आझमी सोमवारी म्हणाले होते. आज देखील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली. मुस्लिमांना आरक्षण का मिळत नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – Maharashtra Assembly Budget Session 2021: मग कशाला हवाय शक्ती कायदा?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल


- Advertisement -

 

- Advertisement -