घरताज्या घडामोडीमहापालिकेचा निकाल राज्यसभेप्रमाणेच लागणार; मुंबईची कन्या म्हणून नवनीत राणा भाजपचा प्रचार करणार

महापालिकेचा निकाल राज्यसभेप्रमाणेच लागणार; मुंबईची कन्या म्हणून नवनीत राणा भाजपचा प्रचार करणार

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी नवनीत राणा यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2022) डोळ्यासमोर ठेऊन राज्यपालांशी चर्चा करणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी नवनीत राणा यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2022) डोळ्यासमोर ठेऊन राज्यपालांशी चर्चा करणार आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत (BMC Election) मुंबईची कन्या म्हणून भाजपचा (BJP) प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी नवनीत राणा यांचा प्रचार यशस्वी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (bjp party win BMC election 2022 like rajysabha election says navneet rana)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर राणा दाम्पत्य राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले. मात्र या भेटीपूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, “राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी यावेळी चर्चा करणार आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबतही चर्चा करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत (BMC Election) मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार आहे”, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री कार चालवतात आणि सरकार भगवान चालवतंय : देवेंद्र फडणवीस

“जो निकाल राज्यसभा निवडणुकीत लागला आहे तोच निकाल महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद भाजपचीच सत्ता येणार” असंही त्यांनी सांगितले. भाजपने ज्याप्रमाणे राज्यसभेत विजय मिळवला, त्याप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, गुप्त मतदान असल्याने शिवसेनेचे ५० टक्के आमदार भाजपला मतदान करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांना तरुंगाची हवा खावी लागली होती.


हेही वाचा – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे – महेश तपासे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -