Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ‘त्या’ क्लिप ताब्यात घेणारा भाजप कार्यकर्ता कोण ?

‘त्या’ क्लिप ताब्यात घेणारा भाजप कार्यकर्ता कोण ?

पूजा चव्हाण आत्महत्येचे गूढ वाढले

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढू लागला आहे. या प्रकरणात बाहेर आलेल्या १२ ऑडिओ क्लिप्स पूजाच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेण्यात आल्या. ज्या क्लिपचा आधार घेत भाजपच्या नेत्यांनी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आरोपी म्हणून घेतले जात आहे. त्या क्लिप्समधील आवाज ज्या अंकुश राठोड या पूजाच्या चुलत भावाचा आवाज म्हणून सांगितला जातो तो आवाज आपल्या मुलाचा नसल्याचा खुलासा अंकुशच्या आईने केला आहे. भाजप नेत्यांच्या हाती या क्लिप्स कुठून आल्या याचा तपास पोलीस करणार आहेत.

ज्या ऑडिओ क्लीपमध्ये वनमंत्री संजय राठोड तसेच अंकुश राठोड यांचा आवाज घेतला जातो तो आपल्या मुलाचा नाही, असा खुलासा अंकुशच्या आईने केला आहे. आता याबाबत धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचे सांगितले जात होते.

- Advertisement -

ही क्लिप ताब्यात घेताना अंकुशच्या ओळखपत्रावरील फोटोही त्या व्यक्तीने मोबाईलमध्ये काढून घेतले. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचे टाळत आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे.

चौकशी करणार्‍या पोलिसांना तिच्या पोस्टमार्टेम अहवालात डोक्याला आणि मणक्याला मार लागल्याची नोंद प्राप्त झाली. चौकशी करणार्‍या पोलिसांना पूजा ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्या फ्लॅटमधून दारुच्या काही बाटल्याही आढळल्याचे सांगण्यात आले. पूजा चव्हाण हिने मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी केल्यानंतर पाय घसरून किंवा चक्कर येऊन ती खाली पडली तर नाही ना याचाही तपास केला जात आहे.

- Advertisement -