घरताज्या घडामोडीदिवंगत लक्ष्मण जगताप यांची आठवण सांगताना चंद्रकांत पाटलांना रडू कोसळलं; म्हणाले...

दिवंगत लक्ष्मण जगताप यांची आठवण सांगताना चंद्रकांत पाटलांना रडू कोसळलं; म्हणाले…

Subscribe

लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने अनेक भाजपा नेत्यांनी जवळचा मित्र गमवल्याचे सांगत शोक व्यक्त केला. शिवाय, भाजपाचे नेते चंद्रकात पाटील यांना शोक व्यक्त करताना रडू कोसळलं. आमदार जगताप यांच्या अंत्यविधीत श्रध्दांजली वाहताना ते बोलत होते.

पिंपरी- चिंचवड शहर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, कन्या ऐश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर पिंपरी- चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने अनेक भाजपा नेत्यांनी जवळचा मित्र गमवल्याचे सांगत शोक व्यक्त केला. शिवाय, भाजपाचे नेते चंद्रकात पाटील यांना शोक व्यक्त करताना रडू कोसळलं. आमदार जगताप यांच्या अंत्यविधीत श्रध्दांजली वाहताना ते बोलत होते. (BJP Pimpri Chinchwad Mla Laxman Jagtap Funeral Chandrakant Patil Crying )

“अखेर आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांना चकवा दिला. तीन वर्षापुर्वी कर्करोगाचे निदान झाल्यापासून त्यांनी आजाराशी झुंज दिली. ती अपयशी ठरली व ते आपल्याला चकवा देवून निघून गेले”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. तसेच, राज्य सभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत तब्येत बरी नसताना ते कसे मुंबईला निघाले, याची माहिती देतानाच त्यांना गहीवरुन आले व ते रडू लागले. रडता रडताच हुंदका आवरत त्यांनी आपले श्रध्दांजलीपर भाषण आवरते घेतले.

- Advertisement -

“आमदार जगताप यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न केले. परंतु; आपण त्यांना वाचवू शकलो नाही. शेवटी पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा. ही जमलेली गर्दी पाहून त्यांनी हे शहर उभे केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य सभा व विधानपरिषद निवडणुकीत आमदार जगताप व आमदार मुक्ता टिळक यांनी तब्येत बरी नसताना येवून मतदान केले व पक्षाप्रती निष्ठा दाखविली. राज्यसभेला एक-एक मत गरजेचे होते. पुढील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या. विधान परिषद निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांची तब्येत बरी नसेल तर राहू द्या, नका बोलवू त्यांना, निवडणुका येतात आणि जातात. शेवटी माणूस महत्वाचा आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “विधान परिषदेच्या निवडणुकी दिवशी आमदार जगताप यांना ताप होता. सकाळी १० वाजता डॉक्टर म्हणाले ताप असताना मी त्यांना सोडणार नाही. मात्र, सकाळी ११ वाजता आमदार जगताप यांचा मला फोन आला, ते म्हणाले की “आता माझा ताप कमी झाला आहे मी येता” आणि गाडी मुंबईला निघाली, असे सांगतानाच पाटील यांना हुंदका आला. निष्ठा म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. वहीनी व त्यांचे भाऊ शंकर जगताप यांनीही त्यांना आडविले नाही. मी त्यांना विश्‍वास देतो आणि संपवतो”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी आपले भाषण संपवले.

- Advertisement -

हेही वाचा – जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी दोन विश्व मराठी संमेलने, एकाचे आज उद्घाटन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -