Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रBJP : भाजपात बंडखोरांच्या घरवापसीला आता निष्ठावंतांचा विरोध; नेमकं प्रकरण काय?

BJP : भाजपात बंडखोरांच्या घरवापसीला आता निष्ठावंतांचा विरोध; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना त्याचा मनस्ताप झाल्याचे समोर आले होते.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. पण आता त्यानंतर भाजपमध्ये नवा वाद पाहायला मिळत आहे. विधानसभेत मिळालेल्या भाजपच्या प्रचंड यशानंतर बंडखोरी केलेल्या उमेदवारांमध्ये आता घरवापसीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशामध्ये आता निष्ठावंत असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत कलहाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत बंडखोरांच्या घरवापसीवरून आक्षेप घेण्यात आला आहे. (BJP politics on leaders who rebelled in assembly election)

हेही वाचा : Congress : नसीम खान यांची ईव्हीएमवर शंका; फेर मोजणीसाठी मोजले एवढे लाख रुपये

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना त्याचा मनस्ताप झाल्याचे समोर आले होते. आता यावरून अंतर्गत वाद सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या सत्कार मेळाव्यात बंडखोरांविरुद्ध बोलताना भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी खंत व्यक्त केली. तसेच, या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असा इशाराच यांच्याकडून पक्षश्रेष्ठींना देण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता, हा वाद अधिक तीव्र होण्याचीदेखील शक्यता आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात दिनकर पाटील यांनी बंडखोरी केली होती. दिनकर पाटील यांना मनसेने उमेदवारी दिली. चांदवड विधानसभा मतदारसंघात राहुल आहेर यांच्या विरोधात केदा आहेर यांनी बंडखोरी केली होती. तसेच बालगाणमध्ये दिलीप बोरसे यांच्याविरोधात जयश्री गरुड यांनी बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे काही स्थानिक नेत्यांनी विरोधी पक्षातील उमेदवारांचा प्रचार केल्याचेही समोर आले होते. पण भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता ते बंदखोर घरवापसी करण्याच्या तयारी असल्याचे समोर आल्यानंतर काही आमदारांनी यावर आक्षेप घेतला.

- Advertisement -

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यावर म्हणाले की, “पाच वर्षांपूर्वी माझ्या विरोधात आपल्याच पक्षातून मला आव्हान देण्यात आले होते. मी शांत राहिलो, पण आता पुन्हा पक्षाने तसे करू नये. सोडून गेलेल्यांना आता पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजप पक्ष हा एकहाती सत्ता मिळवल्याशिवाय राहणार नाही. पण, बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेण्यास आपला विरोध आहे. तसे झाल्यास माझा पहिला राजीनामा असेल.” असा इशाराच त्यांनी यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिला आहे. तसेच, “पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जातील तसेच, पक्षाचे नुकसान होईल आणि ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना नाराज होऊ देणार नाही.” अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -