मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा शनिवारी (23 नोव्हेंबर) निकाल समोर येणार आहे. सध्या राज्यात मतमोजणी सुरू असून पहिला काही तासांत महायुतीला राज्यात मोठे यश मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. अशामध्ये आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “फक्त शिव्या देऊन आणि टीका करून सत्ता येत नाही.” असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे वाटते.’ असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले आहे. (BJP Pravin Darekar after Maharashtra election result 2024 first trends)
हेही वाचा : Sanjay Raut : कुछ तो गडबड है… सुरुवातीच्या कलांवर संजय राऊतांना शंका
पत्रकारांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत जी काही चूक झाली, ती दुरुस्त केली आहे. भाजपचे हे यश महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीने गरिबांच्या कल्याणासाठी काम केले.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पत्रकारांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत जी काही चूक झाली, ती दुरुस्त केली आहे. भाजपचे हे यश महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीने गरिबांच्या कल्याणासाठी काम केले.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली. धर्मयुद्ध आणि ‘एक है तो सेफ है’ चा नारा जनतेने मान्य केला. आता राज्याचा विकास वेगाने होणार आहे. महायुतीने 200 जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढेच नाही तर खरी शिवसेना कोणाची? याचे उत्तरही जनतेने दिले. महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे नक्की. जो पक्ष सर्वात मोठा असेल, त्यांचाच मुख्यमंत्री होणार आहे. मला वाटते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये भाजपला 105 आणी शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापित केले. पण, त्यानंतर अडीच वर्षांआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची फारकत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा केला.