घरमहाराष्ट्रकेवळ पुतना मावशीचे प्रेम दाखविण्याचा हा प्रयत्न; दरेकरांचे मविआला चोख प्रत्युत्तर

केवळ पुतना मावशीचे प्रेम दाखविण्याचा हा प्रयत्न; दरेकरांचे मविआला चोख प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यविरोधात महाविकास आघाडीने 17 डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली. या टीकेला भाजपा आमदार आणि विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाविरोधात सर्व राजकीय पक्षांची एकजूट करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान भाजपा नेहमी करत आली आहे. आजही करतेय आणि पुढेही करत राहील, असे दरेकर म्हणाले.

यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, ज्यांनी अडीच वर्ष काहीच केले नाही, ज्यांना आपले आमदार सांभाळता आले नाहीत ते आता म्हणताहेत सरकार द्या. हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आडून राजकारण करण्याचे षडयंत्र सुरु आहे. छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागणारे संजय राऊतच होते. केवळ पुतना मावशीचे प्रेम दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान भाजपा नेहमी करत आली आहे. आजही करतेय आणि पुढेही करत राहील, असेही दरेकर म्हणाले. तसेच कर्नाटक प्रकरणी बोलताना दरेकर म्हणाले की, वेश बदलून भुजबळ गेले म्हणतात. शिंदेही गेले नव्हते का? हा विषय सामंज्यस्याने हाताळण्याची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची या प्रकरणी राजकीय स्वार्थाने प्रेरित भूमिका दिसून येत असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

- Advertisement -

गेल्या 3 महिन्यांत शिंदेफडणवीस सरकारने महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडीतील एकही नेता विकासावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाही. उद्धव ठाकरे बेकायदेशीर, गद्दारीचा उल्लेख करतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, भाजपासोबत युती म्हणून निवडून आलात व नंतर महाविकास आघाडीसोबत गेलात. याला कोणती नीतिमत्ता म्हणायची, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.


संजय गांधी नॅशनल पार्कात आता सिंहाची जोडी; उद्यानातील अधिवासात मुनगंटीवार सोडणार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -