घरताज्या घडामोडीॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट...

ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट इशारा

Subscribe

राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. कायदा हातात घेण्याचे काम ज्या पक्षाचे सरकार आहे तोच पक्ष घेत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात सरकारच्या मार्गदर्शनाखाली उच्छाद मांडण्यात आला आहे. सुरुवात चेंबूरला झाली. आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात पोलखोल अभियान होणार होती. त्यांच्या पोलखोल अभियान रथाची तोडफोड करण्यात आली. राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांना सोडण्यात आले आहे. भाजप सगळ्या घटनांवर नजर ठेवून आहे. ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो तसेच आमचे हात बांधलेले नाहीत असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनाला दिला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच घडमोडींवरुन ठाकरे सरकारवर निशाणा केला आहे. शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करुन पोलखोल होऊ नये यासाठी दहशत निर्माण केली आहे. पोलखोल अभियानाच्या रथाची तोडफोड करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता परंतु दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. कांदिवलीत अतुल भातखळकर यांच्या इथे सभा असताना स्टेज तोडण्याचा प्रयत्न झाला. दहिसरलासुद्धा तसेच झाले. गिरगावमध्ये पोलखोलची सभा असताना दंगा करण्याचा प्रयत्न झाला असे प्रवीण दरेकरांनी सांगितले.

- Advertisement -

पोलिसांच्या डोळ्यासमोर सत्ताधारी पक्षाची गुंडगिरी 

मोहित कंबोज हे सार्वजनिक रस्त्यावरुन जात असताना सर्व कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणांच्याबाबत हनुमान चालिसा पठण एवढा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते चाल करुन येत होते. तेव्हा १ ते २ किलोमीटर अंतरावर कार्यकर्त्यांना अडवण्यात आले परंतु नवनीत राणांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांना जाण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्या पक्षाचे कार्यकर्त्ते पोलिसांच्या डोळ्या देखत गुंडगिरी करत आहेत असा घणाघात दरेकरांनी केला आहे.

भाजप कार्यकर्ते हात बांधून बसले नाहीत 

दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची सरकार पुरस्कृत गुंडगिरी पोलिसांच्या नजरेसमोर झाली नाही. उलट ही दहशत गुंडगिरीचे समर्थन करताना शिवसेनेचे नेते आहेत. आगीत तेल ओतण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. जर अशा प्रकारचे संमर्थन करणार असाल आणखी आक्रमक होणार असाल आणखी हल्ला करणार असाल तर समोरचे कार्यकर्ते हात बांधून बसायला तयार नाहीत. भाजपचे कार्यकर्ते संघर्ष करणारे आहेत. संघर्षाचा भाजपचा इतिहास आहे. थोडे कार्यकर्ते असताना अनेक टोकाचे संघर्ष भाजपने केलाय. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक भाजप आता मोठा पक्ष आहे. आमच्ये शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप स्वस्थ बसणार नाही. उद्या काही परिणा झाला. संजय राऊत बोलतात टीट फॉर टॅट तर भाजपही तसेच करु शकते. परंतु भाजप संविधानाला, कायद्याला माणारे आहोत. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न असेल असा इशारा दरेकरांनी दिला आहे.

- Advertisement -

पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी 

आमदार लोढा यांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन देणार आहोत. कायदेशीर प्रक्रिया करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे. मोहित कंबोज यांच्या हल्ल्यात पोलिसांना निवेदन दिले असून गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली आहे. जे काही सरकारच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो सहन केला जाणार नाही याला सरकारने तातडीने आवर घालण्याची गरज आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जबाबदारी हातात घ्यायला जनू काही मोकळीक दिले असे वातावरण कधीही नव्हते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा लावण्याची स्थिती निर्माण केली आहे. भाजप या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून निश्चित आहे. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढची दिशा ठरवू असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत तरीही पगार मिळतोय, नवनीत राणांचा घणाघात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -