IT Raids : आयकर विभागाच्या छापेमारीवर भाजपची प्रतिक्रिया

income tax officials raided companies ajit pawar relatives BJP Rection
IT Raids : आयकर विभागाचे छापेमारीवर भाजपाची प्रतिक्रिया

आयकर विभागाच्या छापेमारीवर भाजपकडून प्रतिक्रया देण्यात आली आहे. आयकर विभागाने महाराष्ट्रात घातलेल्या छाप्यांतून उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या तसेच सरकार दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करते आहे , याची माहिती या छाप्यांतून उघड झाली आहे. या बाबत आघाडी सरकारने खुलासा करावा , अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन आयक विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उपाध्याय यांनी म्हटलं आहे की, आयकर विभागाच्या छाप्यात सरकारे जमिनीचे हस्तांतरण तसेच सरकारी मान्यता मिळवून देण्यापर्यंतच्या कामांत मध्यस्थांची साखळी कशी गुंतलेली होती याची माहिती समोर आली आहे. सचिन वाजे या पोलीस अधिकाऱ्याचे खंडणी प्रकरण उघडकीस आले त्यावेळी भाजपाने प्रत्येक खात्यात असे किती वाजे आहेत अशी विचारणा केली होती. आयकर विभागाच्या छाप्यातून उघड झालेली माहिती पाहता असे अनेक वाजे राज्य सरकारच्या यंत्रणेत कार्यरत असल्याचे दिसत आहे. १०५० कोटींच्या व्यवहारांची माहिती आयकर खात्याला आतापर्यंत मिळाली आहे. आघाडी सरकारने या संदर्भात खुलासा करण्याची आवश्यकता असल्याचे उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एका पैशाचीही मदत न करणाऱ्या आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबाबत महाराष्ट्र बंद ची हाक देऊन आपला ढोंगीपणा दाखवला आहे. आघाडी सरकारला शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असता तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडले असते आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असते. मात्र मुख्यमंत्री मुंबईत घरातच बसून आहेत. आघाडी सरकारचे हे मगरीचे अश्रू आहेत. गोवारी मोर्चावर व मावळ गोळीबारावेळी राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार होते हे जनता व शेतकरी विसरलेली नाही असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

अंमली पदार्थांच्या सेवनाने उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या तरुणाईला वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( एनसीबी ) मुंबईत एका क्रूझ वर केलेली कारवाई योग्यच आहे. अशा कारवाईला विरोध करणाऱ्यांनी तरुणाईला वाचविण्यासाठी अशा मोहिमांना तुमचा पाठिंबा आहे की नाही, याचे उत्तर द्यावे अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.