घरदेश-विदेशभाजपच्या ज्येष्ठ नेत्याला हृदयविकाराचा झटका; मुंबईतील रुग्णालयात उपाचार सुरू

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला हृदयविकाराचा झटका; मुंबईतील रुग्णालयात उपाचार सुरू

Subscribe

लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटक्याने दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांना मंगळवारी (26 सप्टेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.(BJP senior leader Netyala suffers heart attack Treatment started in Mumbai hospital)

लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटक्याने दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हुसैन सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हुसैन यांना याआधी ऑगस्टमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.

कोण आहेत शाहनवाज हुसैन?

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांचा जन्म 12 डिसेंबर 1968 रोजी बिहारमधील सुपौल येथे झाला. सध्या ते भाजप पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. हुसेन हे नितीशकुमार आणि एनडीए सरकारमध्ये उद्योगमंत्री होते, पण नंतर सरकार कोसळले होते.

- Advertisement -

हेही वाचा : म्हाडामध्ये तृतीयपंथीयांसाठी घरे राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवलेंचे आश्वासन

आशिष शेलारांच्या घरी असताना तबेत बिघडली तबेत

शाहनवाज हुसेन मुंबईत होते. ते आमदार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील घरी होते. इथूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आशिष शेलार यांनी त्यांना लीलावती रुग्णालयात नेले असता सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट; काय झाली चर्चा?

बिहारचे उद्योगमंत्री पदही सांभाळले

बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शाहनवाज हुसेन यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उभे केले होते. शाहनवाज हुसेन जिंकण्यात यशस्वी ठरले आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना उद्योगमंत्री केले. तथापि, 2022 मध्ये भाजपला मोठा धक्का बसला जेव्हा नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने एनडीएशी संबंध तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -