घरमहाराष्ट्रनाणारबाबत सत्ताधारी सरड्यापेक्षाही अधिक रंगबदलू - अशोक चव्हाण

नाणारबाबत सत्ताधारी सरड्यापेक्षाही अधिक रंगबदलू – अशोक चव्हाण

Subscribe

‘नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून नाणार रिफायनरी बाबत जे काही चालले आहे ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे’. नाणारबाबत सरकारमधील लोकांची परस्पर विरोधी विधाने पाहता सरड्यांनाही लाज वाटेल अशा पद्धतीने सरकार रंग बदलत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

‘मंत्र्यांना मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नाहीत’

मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, ‘नाणार गावचा औद्योगिक क्षेत्रात समावेश करणारी अधिसूचना रद्द केली, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात. तर मुख्यमंत्री म्हणतात अधिसूचना रद्द केली नाही. हायपॉवर कमिटी ही मंत्र्यांपेक्षा मोठी नसते. मात्र मुख्यमंत्र्यांनी हायपॉवर कमिटी मोठी आहे, असे म्हणून आपल्या मंत्र्यांची वाईट अवस्था केली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नाहीत. जनाची नाही तरी मनाची थोडीशी जरी लाज असेल, तर सुभाष देसाई यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शिवसेनेने सत्तेबाहेर पडले पाहिजे’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

काँग्रेस पक्ष नाणार वासियांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. नाणारवासियांच्या मर्जीविरोधात हा प्रकल्प या सरकारला रेटून नेता येणार नाही.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

- Advertisement -

नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज आपला अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सादर केला. २८ एप्रिल रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची भेट घेऊन शिष्टमंडळ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे या शिष्टमंडळासोबत नाणारवासियही खा. राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

पेट्रोल, डिझेलवर लावलेला अन्यायकारक कर कमी करून इंधनावर लावलेले विविध अधिभार रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली असल्याची माहितीही खा. अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -