मुख्यमंत्र्यांवर १०-१२ तासांमध्ये काय जादू झाली ? पंतप्रधानांच्या बैठकीतील गैरहजेरीवर भाजपचा सवाल

PM Modi security breach cm uddhav thackeray demand investigation in pm modi security threat

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानाच्या आढावा बैठकीतील गैरहजेरीवर आता विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या वॉट्स एप चॅटबोटच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीनंतर आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीची तसेच पंतप्रधानांच्या तिरस्काराच्या मुद्द्यावर भाजपने मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या पदभारावरही भाजपने टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या वॉट्स एप चॅटबोटच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीबाबत भाजपने कडाडून टिका केली आहे. पंतप्रधानाच्या बैठकीला गैरहजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा भाजपने समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री हे तिरस्काराच्या भूमिकेने पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित नव्हते. १० ते १२ तासात अशी काय जादू होते ? त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत होते ? खरतर हे सरकार अहंकाराने ओतप्रोत भरले आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री तुम्हाला लागेलच त्यामुळे अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शब्दामध्ये अर्थ आहे

तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे बोलताना केली. मी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची प्रार्थना करतो. मी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करतो, प्रार्थना करतो की ते लवकर बरे व्हावेत. परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री या शब्दामध्ये अर्थ आहे. त्यामुळे तो कोण असेल ते तुम्हीच ठरवायचे आहे. कारण तो मुख्यमंत्री तुम्हाला कामकाजासाठी लागेलच.

एका छोट्या ॲपच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित राहतात, मार्गदर्शन करतात, परंतु प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत. 10-12 तासांत काय अशी जादू घडते की त्यांची प्रकृती ठणठणीत होते? खरंतर राज्याचे मुख्यमंत्री केवळ तिरस्काराच्या भूमिकेतूनच असे वागले अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. परंतु दुर्दैवाने कुणी ही मंत्री राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित नव्हते. हे सरकारला किती जनहिताचे आहे हे यावरुनच दिसून येते. हे सरकार अहंकाराने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांना आपल्या अहंकारापेक्षा राज्याचे विषय महत्त्वाचे वाटत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आरोग्य मंत्री किंवा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी हजर राहायला हवे होते.

शिवसेना संपवण्याचा प्लॅन

पक्षाच्या कोणत्याही बॅनरशिवाय मुंबै बॅंकेची निवडणूक ठरली होती. पण या निवडणूकीत मात्र महाविकास आघाडी सरकार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणुक लढवली. शिवसेनेचे उपाध्यक्ष निवडणूक येणे या निवडणूकीत अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचा उपाध्यक्ष कसा पडला ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचा उपाध्यक्ष संपवण्याचा प्लॅन आहे. उपाध्यक्ष कसा पडला ? याचे आत्मचिंतन शिवसेनेने करावे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.