घरताज्या घडामोडी'औरंगजेब, वाघ, कोथळा', याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नाही; भाजपची टीका

‘औरंगजेब, वाघ, कोथळा’, याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नाही; भाजपची टीका

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यानिमित्त अनेक दिवसांनंतर राजकीय भाषण करत भाजपवर चौफेर टीका केली. या भाषणानंतर भाजपकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सहा ट्विटची मालिका पोस्ट करत मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका केली. शिवसैनिकांसमोर बोलताना तरी मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी द्यायला हवी होती, मात्र त्यांच्या भाषणातला सर्व वेळ केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करण्यात गेला. औरंगजेब, वाघ, कोथला, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही या भाषेपलीकडे काहीच नव्हते, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

- Advertisement -

कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम घेण्यात अडचण असल्यामुळे शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कच्या बाजुला असलेल्या वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात घेतला. यावर देखील भाजपने टीका केली आहे. “अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच पण ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षर न काढणारे आज उध्दव ठाकरे यांना आज सावरकर स्मारकात याव लागल हाच काव्यागत न्याय आहे.”, असे केशव उपाध्ये म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचून दाखविला. मात्र त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रुपये देऊन त्यांची चेष्टाच केली आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात देखील सरकारला सपशेल अपयश आलेले आहे. राज्यातील कोणत्याही घटकास सरकारने दिलासा दिलेला नाही, अशावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना तरी उद्धव ठाकरेंनी खरे बोलायला हवे होते, अशी अपेक्षा उपाध्ये यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -