केंद्र सरकारने राज्यांना दिला GST परतावा, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

BJP state president Chandrakant Patil criticized the state government over GST refunds

केंद्र सरकारने GST परतावा राज्य सरकारला दिला आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली आहे.

या ट्विटमध्ये केंद्राने सर्वच राज्यांना #GST परतावा दिला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये मिळाले आहेत. याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार! मविआ सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवायला नवे विषय शोधावे. आणि हो, पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून जनतेला लुबाडणंही बंद करावे!, असा टोमना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.