तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळे खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल?, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

bjp chandrakant patil speck on shiv sena eknath shinde revolt and maharashtra political crisis

संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, भाजपने त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. या टीकेला चंद्रकात पाटील यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.

मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिले आहे.

संजय राऊतांची भाजपवर टीका – 

शिवसेना खासदार संजय राऊत शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचा समाचार घेतला. चंद्रकांतदादा पाटलांनी 2019ला मोडलेल्या शब्दाचा खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे. फसवणारे कोण आहेत. 2019 साली शब्द कोणी दिला होता. कोणी मोडला. शिवसेना कधीही शब्द मोडत नाही. याच्यावरती आम्ही आता शक्यतो बोलायचं टाळतो. छत्रपती संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी मध्ये चोमडेपणा करू नये, असंही ते म्हणालेत. तसेच या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा संबंध काय आहे. तो शिवसेनेचा प्रश्न आहे, एवढीच चिंता असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना 42 मते द्यावीत. फडणवीस आमच्या पक्षात येतायत का?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांवरही पलटवार केलाय.