घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा

महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा

Subscribe

विधानपरिषदेची निवडणूक (MLC Election )आज पार पडणार आहे. यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. आज विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे आज भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रणकंदन माजताना दिसणार आहे. भाजपची बस विधानसभेत दाखल झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी केला आहे.

विधानभवनाच्या बाहेर चंद्राकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पूर्ण आत्मविश्वासाने आम्ही आता मतदानासाठी आलो आहोत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार १०० टक्के विजयी होतील. या निवडणुकीची स्ट्रॅटेजी राज्यसभा निवडणुकीवेळी आखण्यात आली होती. त्यांच स्ट्रॅटेजीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात केली. आजही रणनिती मोठ्या प्रमाणात आखली जाईल. यावर देवेंद्र फडणवीस यांची रणनिती नक्कीच मात करेल.

- Advertisement -

पाचव्या उमेदवारांना अतिरिक्त मतांची गरज आहे, ती मतं मिळतील का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्याप्रमाणे राजसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारासाठी मतं मिळाली. त्याचप्रमाणे आम्हाला या निवडणुकीत सुद्धा मतं मिळतील. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल. परंतु कोणत्या पक्षाचा हे मला माहिती नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजप आमदार मुक्ता टिळक या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. विधान परिषदेची निवडणूक आज पार पडत आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी मुक्ता टिळक पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा मतदान करण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. विधान परिषदेसाठी एक-एक मत महत्वाचं आहे. त्यामुळे एका जागेवर कोणता उमेदवार बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MLC Election 2022 Live: आदित्य ठाकरे विधानभवनाकडे रवाना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -