घरमहाराष्ट्रभाजपचं वीज बिल होळी आंदोलन; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

भाजपचं वीज बिल होळी आंदोलन; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

वाढीव वीज बिलाविरोधात राज्यात भाजप आक्रमक झाले आहे. भाजपने वाढीव वीज बिलाविरोधात राज्यभरात सोमवारी वीज बिल होळी आंदोलन केले आहे. भाजपचे नेते अतून भातखळ यांच्या नेतृत्वात कांदिवली येथे तहसील कार्यालयासमोर वीजबिलाची होळी करण्यात आली. यावेळी पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अतुल भातखळकर यांच्यासह भाजप आंदोलकांना ताब्यात घेतले.

भाजपने सोमवारी राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन केले आहे. नागपुरात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. तर पुण्यात देखील पुणे शहर भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलांविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकार, मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, कांदिवली येथे अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कांदिवली पोलिसांनी आमदार, नगरसेवक यांच्यासह भाजपचे सर्व पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.

- Advertisement -

पोलीस ठाण्याला घेराव

पोलिसांनी भातखळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन समता नगर पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे आंदोलकांनीही समता नगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चा वळवला असून पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोपर्यंत भातखळकरांना सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे समता नगर पोलीस ठाण्याबाहेरही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरात भाजपचे आंदोलन

नागपुरात भाजपने कोराडी परिसरात महादूला भागात सिद्धार्थ नगरमध्ये वीज बिल होळी आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “लोकांनी वीज बिल भरू नये, आम्ही वीज जोडणी कापू देणार नाही. वीज मंडळाचे कर्मचारी वीज कापायला आल्यास लोकांनी भाजपला कळवावे, आम्ही त्यांच्यासाठी संघर्ष करू, राज ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे अभिनंदन करतो, जनतेच्या मुद्द्यांसाठी ते संघर्ष करत आहेत. सरकारच्या मोगलशाही विरोधात एकत्रित यावेच लागेल.”

- Advertisement -

दिवा येथे भाजपतर्फे वीज बिलांची होळी आंदोलन

वीज बिलात सवलत देण्यास नकार देणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ दिवा येथे भाजप कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी आंदोलन केले. दिवा चौकात वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले. भाजप ठाणे शहर अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा दिवा अध्यक्ष अँड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश पाटील, भाजपचे शहर कार्यकारिणी सदस्य रोहिदास मुंडे,अशोक पाटील, अर्चना पाटील, रोशन भगत, कमलाकर पाटील व मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

diva

पालघर येथे वाढीव वीज बिल विरोधात भाजपचे आंदोलन

पालघर जिल्ह्यात वाढीव वीज बिल विरोधात वीज महावितरण कार्यालय वाडा येथे आज भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध करण्यात आला. बोईसर येथे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील आणि वाडा येथे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्य भारत वीजबिल वाढ विरोधात भाजपने आंदोलन सुरू केलीत या अनुषंगाने हे पालघर जिल्ह्यातील बोईसर आणि वाडा येथे वीज बिल वधी विरोधात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही.

वीज बिल माफ करू असे आश्वासन देणारे सरकार आज वीज बिल माफ करत नाही जर आश्वासनाची पूर्तता करता येत नाहीत तर आश्वासन देता कशाला असा सवाल तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आंदोलनादरम्यान केला. कुठल्याही प्रकारची रीडिंग न घेता भरमसाठ बिले माथी मारली. कोरोना पादुर्भाव असताना वीजबिल आकारणी बाबत मीटर रीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा बिले लादण्यात आली.आणि ही वीजबिल गरीब जनता भरणार कशी असा सवाल यावेळी करण्यात आला. वीज बिल माफ झालीच पाहिजेत अशा घोषणा देऊन वाडा वीज महावितरण कार्यालयाच्या प्रवेश द्वाराजवलच वीज बिलाची होळी करण्यात आली. रोजगार नसलेल्या आदिवासी समाजाने,गरिबाने भरमसाठ बिले भरायची कशी?

palghar

पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज, गोर गरीब समाज हा रोजंदारीवर काम करतोय आणि आपले पोट भरतोय अशातच कोरोणा काळात त्याच्याकडे रोजगार नाही आणि अशी भरमसाठ बिले तो कसे भरणार असा सवाल आदिवासी आघाडीचे प्रमुख राजू दळवी यांनी यावेळी खंत व्यक्त केली. वाढीव वीज बिल माफ करावे अशी मागणी यावेळी आंदोलकर्त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -