Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भाजपने कर्नाटक पराभवाचा घेतला धसका; आगामी लोकसभेसाठी कंबर कसली

भाजपने कर्नाटक पराभवाचा घेतला धसका; आगामी लोकसभेसाठी कंबर कसली

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप पक्षाची झोप उडाली आहे. भाजपकडून दाखविण्यात येत नसले तरी त्यांनी या पराभवाचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप पक्षाची झोप उडाली आहे. भाजपकडून दाखविण्यात येत नसले तरी त्यांनी या पराभवाचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे. (BJP takes the blow of Karnataka defeat; Gearing up for the upcoming Lok Sabha) काँग्रेसला मिळालेला ऐतिहासिक विजय आणि भाजपचा दारूण झालेला पराभव यामुळे भाजप सध्या तरी चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी आत्तापासूनच सुरू केलेली आहे. याबाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – कर्नाटकात मुस्लीम मुख्यमंत्री हवा, पण तूर्त उपमुख्यमंत्री तरी कराच; सुन्नी संघटनेची मागणी

- Advertisement -

नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, “कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी 25 लाख युवा वॉरियर्स तयार करण्यात येणार आहेत. 18 ते 25 वयोगटातील सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. युवकांकरिता आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर नमो चषक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.”

तसेच, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या असल्यामुळे उशिरा होत आहे. त्यांच्यामुळे निवडणुका लांबल्या गेलेल्या आहेत. भाजपमुळे निवडणुका लांबलेल्या नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टातील केसेस परत घेतल्या तर कधीही निवडणूक लागू शकतात, अशी माहिती यावेळी बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे. तर, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाही. विरोधकांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली तरी त्यांना राज्यात आपलीच सत्ता येईल असे वाटत आहे, अशी टीका देखील यावेळी बावनकुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

कर्नाटकातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राहुल गांधी यांचे अभिनंदन करत भाजपला त्यांचा आत्मविश्वास नडला, असे मत व्यक्त केले आहे. निवडणूक निकालाच्या तीन दिवसानंतर देखील कर्नाटकातील मुख्यमंत्र्याचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. यासाठी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांच्या नावांची चर्चा सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

- Advertisment -