घरठाणेश्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपचा डोळा? रोहित पवारांचं समर्थन करत राजू पाटलांचं मोठं...

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपचा डोळा? रोहित पवारांचं समर्थन करत राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

कल्याण लोकसभा ही पूर्वीपासून भाजपचीच होती. मात्र, ज्या वेळी भाजपचं काही चालत नव्हतं, त्यावेळेस स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी आपल्याकडे खेचून घेतली होती. आत्ता कुठेतरी भाजप वरचढ होत असताना दिसून येत असून, ते संधी सोडतील असं मला वाटत नाही, असं राजू पाटील म्हणाले.

Shinde Vs BJP: लोकसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होतील. त्यासाठी आतापासून आघाड्या, युती यांची मोर्चेबांधणी सुरू झालीय. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी आकाराला आली आहे. यात 24पेक्षा जास्त पक्ष आहेत. दुसऱ्याबाजूला भाजपच्या नेतृत्वाखाली NDA सुद्धा स्वत:ला अधिक भक्कम बनवत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासून काही लोकसभा मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे सु्रू झाले आहेत. मित्र पक्षाच्या जागेवरच सहकारी पक्षाकडून दावा सांगितला जात आहे. मित्रपक्ष असला, तरी पाठीमागच्या दाराने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. तिन्ही पक्षात अजून जागा वाटपाची कुठलीही बोलणी किंवा चर्चा झालेली नाही. परंतु असं असताना राजू पाटील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ( BJP targeted on Shrikant Shinde seat Raju Patil big statement supporting Rohit Pawar said )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचं लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपी उमेदवाराच्या दिशेने चालली आहे, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. कल्याण लोकसभा ही पूर्वीपासून भाजपचीच होती. मात्र, ज्या वेळी भाजपचं काही चालत नव्हतं, त्यावेळेस स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी आपल्याकडे खेचून घेतली होती. आत्ता कुठेतरी भाजप वरचढ होत असताना दिसून येत असून, ते संधी सोडतील असं मला वाटत नाही, असं राजू पाटील म्हणाले.

- Advertisement -

रोहित पवार काय म्हणाले होते?

रोहित पवार म्हणाले होते की, श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तुमची युती असेल तर तुम्ही तिथे बैठका घेण्याचे, चाचपणी करण्याचे कारण काय? भाजपला केवळ त्यांचा पक्ष, चिन्ह समजते बाकी कुठलेही नेते आणि लोकांचे प्रश्न कळत नाही. अनुराग ठाकूर यांना या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. कारण इथे मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनाच इथली जबाबदारी दिली आहे. कारण इथे मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनाच इथली जबाबदारी दिली आहे इतकेच नाही तर मंत्रक्षी रवींद्र चव्हाण यांना कदाचित भाजपाकडून इथली लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, असं दबक्या आवाजात बोलले जाते असंही त्यांनी म्हटलं.

(हेही वाचा: Kirit Somaiya : कथित व्हिडीओ पुन्हा चर्चेत; व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी, सोमय्यांचा आरोप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -