घरताज्या घडामोडीफडणवीसांनी घेतली तातडीची व्हिसी, मलिकांच्या मागावर CBI, NIA, ED चे शुक्लकाष्ठ

फडणवीसांनी घेतली तातडीची व्हिसी, मलिकांच्या मागावर CBI, NIA, ED चे शुक्लकाष्ठ

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत अंडरवर्लड कनेक्शनचे आरोप केल्यानंतर मलिक यांनी लगेचच या आरोपांना उत्तर दिले. नवाब मलिकांकडून या आरोपांवर स्पष्टीकरण आले. फणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असणाऱ्यांशी संबंध आणि व्यवहार कसे आहेत याची पोलखोल नवाब मलिक यांनी केली. त्याचवेळी फडणवीसांनी ओले फटाके वाजवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पण नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने तत्काळ रणनिती आखण्याची सुरूवात केली आहे. भाजपच्या निवडक नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर झाली. त्यानुसार आता नवाब मलिकांविरोधात कोण बोलणार इथपासून ते केंद्राच्या यंत्रणा सक्रीय होण्याचे संकेत मिळत आहेत.

नवाब मलिकांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपने या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नवीन रणनिती आखली आहे. फडणवीसांच्या दिवाळीनंतरच्या बॉम्बनंतर नवाब मलिकांना पुरते घेरण्याची रणनिती भाजपने आखली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचे भाजपच्या नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कृपाशंकर सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ, नितेश राणे, राम कदम, आशिष शेलार आदी नेते हजर होते. या बैठकीत नवाब मलिकांच्या आरोपांवर कोण बोलणार हेदेखील निश्चित झाले असल्याचे कळते. महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यापुढच्या काळात नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर देणार नाहीत, अशीही माहिती मिळते आहे. या प्रकरणात नवाब मलिकांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपच्या दुसऱ्या फळीतले नेते सक्रीय झाल्याचे पहायला मिळते आहे. त्याचाच प्रत्यय हा नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर आला. नवाब मलिकांच्या खुलाशानंतर तत्काळ भाजपकडून आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी सगळे आरोप कबुल केल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटले.

- Advertisement -

मलिकांच्या मागावर तपास यंत्रणाचे शुक्लकाष्ठ

नवाब मलिक यांना घेरण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर यापुढच्या काळात होणार असल्याचे संकेत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. फडणवीसांनी मलिकांवर आरोप करताना या व्यवहाराबाबतचे पुरावे हे योग्य यंत्रणांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे संपुर्ण प्रकरणात पैशांचा व्यवहार असल्याने ईडीचा रोल येणार आहे. तसेच दहतवाद्यांशी कनेक्शन असल्याने यामध्ये नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) चा रोल येणार आहे. तसेच सीबीआयदेखील या प्रकरणात सक्रीय होणार असल्याचे कळते. खुद्द फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत याबाबत सुतोवाच केले होते. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये नवाब मलिकांना घेरण्यासाठी या केंद्रीय यंत्रणांचा वापर होणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या रणनितीमध्ये या रणनितीचाही समावेश असल्याचे कळते.


हेही वाचा नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब एजाज लकडावाला तर नाही ना?; नवाब मलिकांची १० वाजता पत्रकार परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -