घरट्रेंडिंग२००२ पर्यंत भारतात 'या' संघटनांनी तिरंगा फडकावला नाही - संजय राऊत

२००२ पर्यंत भारतात ‘या’ संघटनांनी तिरंगा फडकावला नाही – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्र भाजपमधील नव सावरकरप्रेमींचा सावकरांची ढाल करून राष्ट्रवादाचे राजकरण करत असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून कऱण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ढाल करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण करत आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार नाही. पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल अशा शब्दात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. त्याच बरोबर स्वातंत्रयवीर सावकर यांच्या मराठीसाठीच्या योगदानाचा उहापोहदेखील आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आजच्या  वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्ध होते. मराठी भाषेत सावकरांनी शुद्धीचे प्रयोग केले. आजच्या मराठी भाषेच्या निमित्तानेही वीर सावरकर यांचे स्मरण करण्यात आले आहे.

भाजप स्वतःच कोंडीत सापडली आहे

- Advertisement -

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकांच्या विषयावर सरकारची कोंडी करू नये, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी केला आहे. सावकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहीला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळ्यांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे जे ढोंग आज करत आहेत त्यांना सावरकर खरच कळले काय असाही सवाल अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. भाजप स्वतःच कोंडीत सापडले आहे, त्यांनी दुसऱ्यांची कोंडीची भाषा करू नये.

मोदींनी सावरकरांना भारतरत्न का दिला नाही ?

- Advertisement -

कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना भारतरत्न का जाहीर केला नाही असा सवाल अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यावर महाराष्ट्रात हे नवसावकर प्रेमी काही प्रकाश टाकणार का ? फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पत्रे पाठवली त्याचे काय झाले असाही सवाल या निमित्ताने करण्यात आला आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळ्यांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहीले अशा शब्दाच्या सामनाच्या अग्रलेखात सावरकर यांच्याबाबतचा आदर व्यक्त करण्यात आला आहे. केंद्राने दखल घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाला सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, गोमामेसंदर्भातील परखड विचार पेलवणारे आहेत का. ?

स्वातंत्र्यवीर सावकरांची ढाल करून नवराष्ट्रवादाचे राजकारण

वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा संघ परिवार कोठे होता ? १९४७ साली स्वातंत्रदिन संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. तिरंग्याचा घोऱ अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या संघटना २००२ पर्यंत राष्ट्रध्वज फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतिक आहे. पण भगव्याच्या बरोबरीने तिरंगाही फडकावला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ढाल करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण करत आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार नाही. पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -