Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे भाजप उपाध्यक्ष संजय काकडेंनी नितेश राणेंना झापले, म्हणाले - "तुमच्यामुळे..."

भाजप उपाध्यक्ष संजय काकडेंनी नितेश राणेंना झापले, म्हणाले – “तुमच्यामुळे…”

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेचे अधिकारी आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये झालेल्या वादाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी आता भाजप उपाध्यक्ष संजय काकडे यांनी नितेश राणे यांना चांगलेच झापले आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेचे अधिकारी आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये झालेल्या वादाची चर्चा सुरू आहे. नितेश राणे यांनी पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी करत पुणे महापालिका अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. ज्यानंतर या अधिकाऱ्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे या प्रकरणी आता भाजप उपाध्यक्ष संजय काकडे यांनी नितेश राणे यांना चांगलेच झापले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा चांगली नाही तर मलिन होत आहे, असे म्हणत काकडे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. (BJP vice-president Sanjay Kakde took a dig at Nitesh Rane)

हेही वाचा – “तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नसेल तर…” 96 कुळी मराठ्यांबाबत मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

- Advertisement -

नितेश राणे यांनी पुण्यात भाजपच्या वतीने मोर्चा काढत पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी आंदोलनादरम्यान केली होती. आत घुसलो तर अधिकार्‍यांना कुठे पळायचे कळणार नाही. पुन्हा महापालिका आयुक्तांना ‘लव्हलेटर’ पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार राहा, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला होता. तर आपला ‘बॉस’ सागर बंगल्यावर बसलाय, आपण काहीही केले तरी सहीसलामत बाहेर पडू, असे म्हणत पुण्यातील आंदोलनात भडकाऊ भाषण केले होते. त्यामुळे आता या प्रकरणावरून संजय काकडे यांनी नितेश राणे यांना फैलावर घेतले आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय काकडे म्हणाले की, नितेश राणे जर कापाकापीची भाषा करत असतील तर मी त्याचा निषेध करतो. जे काही अनधिकृत बांधकाम असेल त्यावर अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात येईल. आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करू. ते कायद्यात असेल ते काम करतील. कोणी काही म्हणत असो मात्र देवेंद्र फडणवीस हे चुकीच्या कार्याला थारा देणार नाहीत. नितेश राणे जर म्हणत असतील आम्ही कापाकापी केली तर देवेंद्र फडणवीस मला मदत करतील तर असे काहीही नाही. नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचे आणि बुद्धी नसलेलं आहे.

- Advertisement -

तसेच, नितेश राणे यांचे वाक्य मी पुन्हा ऐकणार आहे. चुकीचे असेल तर त्याविषयी मी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिणार आहे. त्यांनी केलेले वक्तव्य आपल्या पक्षाची प्रतिमा चांगली करत नसून पक्षाची प्रतिमा मलिन करत आहे, असे स्पष्ट सांगणार आहे. नितेश राणे जर काही कापाकापी बद्दल बोलले असतील तर त्याचा निषेध मी आधीच केला आहे. प्रशासकाबद्दल आमच्या मनात काहीच कटुता नाही. त्यामुळे प्रशासकाची योग्य भूमिका आमच्या पक्षाला मान्य असेल, असे म्हणत काकडे यांनी नितेश राणे यांना चांगलेच सुनावले आहे.

- Advertisment -