मुंबई : महाकुंभसाठी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तिथे गंगेत करण्यात येणाऱ्या स्नानावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशात टिप्पणी केली होती. त्यावरून भाजपा नेते आक्रमक झाला आहेत. हिंदूंचा द्वेष आणि सनातनची टिंगल करण्याव्यतिरिक्त देशद्रोही काँग्रेसला दुसरे जमते काय? असा प्रश्न भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केला आहे. (BJP Vs Congress: Chitra Wagha’s reply to Mallikarjun Kharge)
मध्य प्रदेशच्या महू येथे काँग्रेसतर्फे सोमवारी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाकुंभातील स्नानाबद्दल टिप्पणी केली होती. गंगा नदीत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का? पोटाला अन्न मिळते का? मुले उपासमारीने मरत असतात, मुले शाळेत जात नसते, मजुरांना त्यांचे वेतन मिळत नसते, तेव्हा हे लोक जाऊन हजारो रुपये खर्च करत असतात. गंगेत डुबकी मारण्यासाठी त्यांच्यात स्पर्धाच लागते. टीव्हीवर काहीतरी चांगले फुटेज मिळेपर्यंत ते डुबकी मारत राहतात. अशा लोकांपासून देशाला काहीही फायदा होणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
हिंदूंचा द्वेष आणि सनातनची टिंगल… देशद्रोही काँग्रेसला दुसरे जमते काय ?
प्रयागराज येथील ‘महाकुंभ’ मध्ये करोडो श्रद्धाळू आणि भाविक सामील होत आहेत, पवित्र स्नान करीत आहेत. आधी त्यांच्यापुढे नतमस्तक !
नेहमीप्रमाणे हिंदूंची आणि सनातन धर्माची टिंगल, चेष्टा करण्याची आणि मजाक… pic.twitter.com/Ddz9Q1rmjn
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2025
यावरून आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. नेहमीप्रमाणे हिंदूंची आणि सनातन धर्माची टिंगल, चेष्टा करण्याची संधी देशद्रोही काँग्रेस पक्षाने साधली आहे. हिंदूंचा द्वेष आणि सनातनची टिंगल करणे, याशिवाय देशद्रोही काँग्रेसला दुसरे जमते काय? प्रयागराज येथील महाकुंभमध्ये कोट्यवधी श्रद्धाळू आणि भाविक सहभागी होत आहेत, पवित्र स्नान करीत आहेत. आधी त्यांच्यापुढे नतमस्तक होते आणि या ‘महाकुंभ’ची खिल्ली उडवल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांचा तीव्र शब्दांत निषेध करते, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Dhananjay Munde : माझ्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस आणि पवार स्पष्ट उत्तर देतील – धनंजय मुंडे
खर्गे यांचे हेच उद्गार हज यात्रा किंवा इफ्तार पार्टीलाही लागू होतात. त्यावेळी असे उद्गार काढण्याची हिंमत आहे का या देशद्रोही काँग्रेसवाल्यांची? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. तथापि, मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भाषणातच दिलगिरी व्यक्त केली होती. मला कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावायचा नाही. कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे त्यांनी लगेचच म्हटले होते. (BJP Vs Congress: Chitra Wagha’s reply to Mallikarjun Kharge)
हेही वाचा – Thackeray Vs Shinde : एका माजी नगरसेविकाच्या प्रवेशावरून आदित्य ठाकरे अन् शिंदेमध्ये जुंपली