(BJP Vs Congress) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणेची राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. याबाबत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी महाराष्ट्रातील एका रॅलीत नड्डा यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे एकता असेल तर आपण सुरक्षित राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. (Nadda hits back at Rahul Gandhi on ‘Ek Hain Toh Safe Hain’ issue)
जेव्हा पंतप्रधान मोदी ‘एक हैं तो सेफ हैं’ असे म्हणतात, याचा अर्थ असा होतो की, एकत्र राहाल तरच सर्वजण सुरक्षित राहतील. मात्र, मी तुम्हाला राहुल गांधी यांच्या दृष्टीने ‘एक हैं तो सेफ हैं’ याचा अर्थ सांगतो. राहुल गांधी यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील एकही मित्रपक्ष उपस्थित नव्हता. याच्या ‘एक’चा अर्थ ‘तुम्ही एकटे असाल तरच सुरक्षित राहाल.’ राहुल गांधी हे नेहमीच एकटे राहतात, त्यामुळे त्यांना आपण सुरक्षित आहोत, असे वाटते. त्यांनी आधी काँग्रेस नेत्यांना एकत्र करावे, त्यानंतरच ते देशाची एकता आणि सुरक्षिततेबाबत बोलू शकतील, असा टोलाही नड्डा यांनी लगवला.
हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना काय सुनावलं, रायगडमधील राजकारणाला नवा ट्विस्ट ?
संविधानाच्या बाबतीत लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. आजकाल राहुल गांधी संविधानाचे पुस्तक घेऊन फिरत आहेत. पण त्यांनी संविधानाचे पुस्तक वाचलेले देखील नाही. ते फक्त हे पुस्तक घेऊन फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असे लिहिले आहे. पण आज कर्नाटकात खासगी कंत्राटदारांना टेंडर देताना काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांना चार टक्के आरक्षण देत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी आज, सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद बोलावून ‘एक हैं तो सेफ हैं’ लिहिलेली तिजोरी पत्रकारांसमोर ठेवली. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो होता. म्हणजेच, मोदी आणि अदानी एक राहिले तर, तिजोरी (हिंदी भाषेत सेफ) ताब्यात राहील, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा दाखवत, ‘एक कौन है, सेफ कौन हैं और सेफ (तिजोरी) किसका हैं,’ असे प्रश्न त्यांनी विचारले होते. नड्डा यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. (BJP Vs Congress: Nadda hits back at Rahul Gandhi on ‘Ek Hain Toh Safe Hain’ issue)