घरमहाराष्ट्रBJP vs Congress : म्हणूनच म्हणतोय 'हात बदलेगा हालात'...; वर्षा गायकवाडांचा शेलारांवर...

BJP vs Congress : म्हणूनच म्हणतोय ‘हात बदलेगा हालात’…; वर्षा गायकवाडांचा शेलारांवर पलटवार

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी काँग्रेसने ‘हात बदलेगा हालात’ असा दावा जाहिरातीद्वारे केला आहे. तर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत, पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, अशी टीका काँग्रेसवर केली आहे. आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Ashish Shelar : पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर निशाणा

- Advertisement -

आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील शरसंधान केले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी फटकारलेल्या काँग्रेसच्या जाळ्यातच उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे अडकले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी एक कविता शेअर केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. कमळाचे फुल चिखलात फुलते, पण याचा अर्थ असा नाही की, सर्वसामान्यांचे जीव ही त्याच चिखलात रुतवायचे, असे सांगत त्यांनीही एक कविता शेअर केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

अब की बार भाजपा की निश्चित हार..!
लोकशाही संपवणे हे यांचे ध्येय, न केलेल्या कामांचे लाटतात श्रेय,
बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचे स्वप्न हे पाहतात,
भांडवलदारांना वाचवण्यासाठी जनतेला चिखलात फेकून देतात,
आपलीच मर्जी चालावी म्हणून म्हणेल त्या थराला जातात…
अब की बार भाजपा तडीपार..!
हाताला कामधंदा नाही युवा घरी, शेतपिकाला भाव नाही हतबल शेतकरी,
महिलांचे वाढतेय शोषण, शिगेला गुन्हेगारी, वाढती महागाई गोरगरिबांच्या खिशावर भारी,
जनतेचा हक्क मारून मित्रांच्या ताटात बटर-खारी…
अब की बार भाजपा बेजार..!
रोज नवे कपडे, रोज नवे भाव, भ्रष्टाचारवादी हुकूमशाह यांचे नाव,
दुरूनच मांडतात मन की बात, जनतेचे पैसे खात-खात,
केवळ स्वतःचा गौरव, करतात चमकोगिरी,
चिखलाचे गोळे फेकतात जनतेच्या दारी…
अब की बार भाजपा का उठ जायेगा बाजार..!
कधी PM Caresच्या नावाने, कधी इलेक्टोरल बाँडच्या नावाने,
वसुलीचा यशस्वी चालवतात कारभार, आता मोडणार जनता यांचा अहंकार…
अब की बार रुकेगा मोदी का भ्रष्टाचार..!
ना खाणार-ना खाऊ देणार म्हणत उंच यांचे नाक,
मुळचा लबाडी स्वभाव लुबाडणार ईडी सीबीआयचा दाखवून धाक…
अब की बार भाजपा खायेगा जनमत की मार..!
बाहेर काढूच जनतेला, दलदल ही चिखलाची
कटीबद्ध आम्ही शपथ घेतलीय जनतेला सावरण्याची,
स्थिती बदलू आम्ही, महाराष्ट्राचा इतिहास नि गुणगान गात
म्हणूनच म्हणतोय आम्ही ‘हात बदलेगा हालात’…
बघा तानाशाहाचा पाडाव कसा होतो ते..
अब की बार एकजुटीने करू हुकूमशाहाला हद्दपार..!

हेही वाचा – Thackeray group : स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ठाकरे गटाच्या रडारवर मोदी सरकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -