घरमहाराष्ट्रBJP VS NCP-SP : आता "तुतारी" वाजेल की...; भाजपाच्या 'या' नेत्याची खोचक...

BJP VS NCP-SP : आता “तुतारी” वाजेल की…; भाजपाच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. विधिमंडळातील संख्याबळावरून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (22 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह दिले आहे. यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे शनिवारी (24 फेब्रुवारी) रायगडावर नव्या पक्ष चिन्हाचे अनावरण करणार आहेत. मात्र सत्ताधारी पक्ष शरद पवार गटाला मिळालेल्या ‘तुतारी’ चिन्हावर टीका करताना दिसत आहे. (BJP VS NCPSP Now it remains to be seen whether the trumpet will sound or the air will clear BJPs Sujay Vikhe Patils criticism)

हेही वाचा – Politics : “तुतारी” फक्त स्टेजवर…; अजित पवार गटाची टीका, आव्हाडांवरही साधला निशाणा

- Advertisement -

शरद पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यासह ठाकरे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मशाली घ्या तुतारी वाजवा. हवे तर त्यांना नव्या तुतारी आम्ही घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल, असा टोला लगावला आहे. तसेच चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेले आहे, पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतला गेला आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जोपर्यंत बॅलेटवर चिन्ह येत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, अशी टीका करत सुजय विखे पाटील यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग नरमले; मुंबईतील शिक्षकांना कामातून वगळले

- Advertisement -

‘तुतारी’ चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष’ हे नाव शरद पवार गटाला दिले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीत चिन्हाची गरज नाही म्हणून शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह दिले नव्हते. याविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवून एक आठवड्याच्या आत निवडणूक चिन्ह देखील देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या 19 फेब्रुवारीच्या आदेशानुसार “तुतारी फुंकणारा माणूस” हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह त्यांना वापरता येणार आहे. पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत ‘तुतारी’ हे चिन्ह पोहचवण्याचे आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -