महायुतीनं 237 आमदार निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. पण, सत्ता हाती जरी आली असली, तर मुख्यमंत्रिपदावर घोड अडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरून दावा सोडला असला, तरी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब अद्याप झाला नाही. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, असाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. पण, भाजपला महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून हवे आहेत.
माझ्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळत नसेल, तर मी महायुतीचं संयोजकपद घेईल, असं एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठांना कळवल्याचं बोललं जात होते.
हेही वाचा : “अजितदादा ‘CM’ झाले तर मी स्वत:…”, रोहित पवारांचं विधान चर्चेत
मात्र, गुरूवारी गृहमंत्री अमित शहा यांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याशी बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे म्हणून भाजप भलतीच आग्रही आहे.
फडणवीसांबाबत चूक दुरूस्त करणार…
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, भाजप देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार आहे. कारण, यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना दोन नंबरचे पद सांभाळावं लागलं होतं. ही चूक दुरूस्त करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे.
अजितदादांवर अवलंबून राहणार नाही…
महायुती एकत्र असल्याचं सांगण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री घ्यावं, अशी इच्छा भाजपची आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत ठेवल्यानं भाजपला अजितदादांवर अवलंबून राहता येणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : फडणवीस अन् अजितदादांचे हसरे चेहरे, शिंदेंचा चेहरा गंभीर; अडीच तासांच्या बैठकीनंतर काळजीवाहू ‘CM’ म्हणाले…