घरमहाराष्ट्रबाळासाहेबांमुळेच मोदी मुख्यमंत्री, 'त्या' घटनेची Sanjay Raut यांनी करून दिली आठवण

बाळासाहेबांमुळेच मोदी मुख्यमंत्री, ‘त्या’ घटनेची Sanjay Raut यांनी करून दिली आठवण

Subscribe

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्यासाठी घेतला होता. त्यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांना सांगितले की गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल आणि हिंदुत्वाचे नुकसान होईल. त्यावेळी वाजपेयींनी निर्णय मागे घेतला, या घटनेची आठवण करून देत ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी भाजपा शिवसेनेमुळे महाराष्ट्रात वाढू शकली, याबाबतची आठवण करून दिली आहे. नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्यावेळी घडलेली घटना सांगितली. (BJP was reminded of that incident by Sanjay Raut)

हेही वाचा – “तिघांमध्ये झालेले लग्न टिकत नसते”, Sanjay Raut यांनी साधला महायुतीवर निशाणा

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भाजपाची काही नेतेमंडळी ही मुंबईत शिवसेनाही भाजपामुळे असल्याचे विधान वारंवार करत आहे. ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामधील वाद आणखी भडकत आहे. परंतु, त्यांच्या याच वक्तव्यांना आता संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याचवेळी त्यांनी जर का काही वर्षांपूर्वी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवले असते तर ते आज पंतप्रधान झाले नसते, याची आठवण करून दिली आहे. ज्यावेळी आडवाणी आणि वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्यात आले होते. त्यावेळी वाजपेयींनी निर्णय मागे घेतला. आज तेच मोदी दिल्लीत आहेत. त्याच मोदींच्या जोरावर हे महाराष्ट्रातले ओंडके, सोंडके डोळे वटारुन दाखवत आहेत. 2024 ला हे नसेल, असे सांगत त्यांनी भाजपातील नेतेमंडळींवर निशाणा साधला आहे.

तर, यावेळी त्यांनी मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुकांपासून तुम्ही का पळ काढत आहात? त्याचे उत्तर द्या. निवडणुका घेतल्या की कोण कोणामुळे मोठे झाले याचे उत्तर जनता देईल. आपण कोण होतात, काय झालात आणि कोणामुळे झालात? याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये कृतज्ञता या शब्दाला महत्व आहे. हिंदुत्व जर भाजपा मानत असेल तर कृतज्ञता आणि उपकारांची जाण या दोन शब्दांचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळी भाजपासाठी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला आहे. त्याचे स्मरण हे नव्या पिढीने करावे, त्यांना माहीत नसेल तर आम्ही सांगायला तयार आहोत. आज गोपीनाथ मुंडे नाहीत, लालकृष्ण आडवाणी एका बाजूला आहेत. आडवाणी यांनाही विचारले तरीही ते सांगतील महाराष्ट्रात भाजपा कोणामुळे वाढली?, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -