घरमहाराष्ट्रकामगिरीच्या आधारे भाजपा मते मागणार - विनय सहस्त्रबुद्धे

कामगिरीच्या आधारे भाजपा मते मागणार – विनय सहस्त्रबुद्धे

Subscribe

देशाच्या राजकीय इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाकडून भावनिक मुद्द्यांच्या ऐवजी कामाच्या आधारे जनतेला मते मागण्यात येत असून ही हिंमत भाजपामध्येच आहे, असे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे.

‘भारतीय जनता पार्टीच्या आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत विशेष कामगिरी केली असून या निवडणुकीत भाजपा आपल्या कामगिरीच्या आधारे जनादेश मागेल. देशाच्या राजकीय इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाकडून भावनिक मुद्द्यांच्या ऐवजी कामाच्या आधारे जनतेला मते मागण्यात येत असून ही हिंमत भाजपामध्येच आहे’, असे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंगळवारी मुंबई येथे केले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

बहुमताने सत्तेवर आलेले भाजप सरकार

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दोन उमेदवार आजच बिनविरोध विजयी झाले असून ही भाजपाच्या विजयाची सुरुवात आहे. तसेच पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेले आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपाचे सरकार हे पहिलेच काँग्रेसेतर सरकार आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षांत उत्तरदायित्व, पारदर्शिता, कल्पकता आणि जनसहभाग यांच्या आधारे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपाचे कामगिरीचे राजकारण (पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स) आणि विरोधी पक्षांचे भयगंडाचे राजकारण असा या निवडणुकीतील सामना आहे, असे ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

ही कामे मोदी सरकारने केली

भटक्या विमुक्तांसाठी आयोगाची स्थापना, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, आर्थिक मागासांना आरक्षण, पन्नास शहरात मेट्रोचे काम, नदीतून देशांतर्गत जलवाहतूक, कृषी मालाच्या आयात निर्यातीसाठी प्रथमच धोरण निर्मिती, नक्षल्यांच्या हिंसेवर नियंत्रण, ईशान्य भारत बंडखोरीमुक्त करणे अशी अनेक कामे मोदी सरकारने केली आहेत. हा नवा भारत आहे. अरे ला कारे करणारा भारत आहे, हे देशाने तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवून दिले. ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’च्या आधारे भाजपा जनादेश मागत आहे. दुर्दैवाने यापूर्वी अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने तसे केलेले नाही.

वेतनाची घोषणा हा काँग्रेसचा भूलभुलैय्या

किमान वेतनाची काँग्रेसची घोषणा हा भूलभुलैय्या आहे. मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही. इतक्या वर्षांच्या सत्तेमध्ये काँग्रेसला गरीबी हटवता आली नाही, याचीच ही कबुली आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने तेथे असंतोष आहे. काँग्रेसची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्च रोजी देशभरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अस्वच्छता, भ्रष्टाचार, गरिबी आणि दहशतवाद याच्या विरोधात लढण्यासाठी नागरिक चौकीदार म्हणून या संवाद कार्यक्रमात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वाचा – मोदींविरोधात उत्तर प्रदेशमध्ये तोगडिया रिंगणात

वाचा – नरेंद्र मोदींच्याच हातात देश सुरक्षित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -