घरताज्या घडामोडीकर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

कर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Subscribe

'कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळेल. कारण लोकांनी देशामध्ये मोदींना स्वीकारलं आहे', असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्नाटक दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी असा विश्वास व्यक्त केला.

‘कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळेल. कारण लोकांनी देशामध्ये मोदींना स्वीकारलं आहे’, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्नाटक दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी असा विश्वास व्यक्त केला. तसेच, ‘आपले मुख्यमंत्री मोदींसोबत काम करणारे असले, तर विकासाला वेग येतो. मोठ्या योजना राबवल्या जातात’, असे फडणवीस यावेळी म्हणाले. (BJP will get absolute majority in Karnataka Trust To Maharashtra DCM Devendra Fadnavis)

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशात महाराष्ट्रातील भाजपचे नेते कर्नाटकात जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर भाजप नेते कर्नाटक दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले फडणवीस?

‘कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळेल. कारण लोकांनी देशामध्ये मोदींना स्वीकारलं आहे. लोक मोदींवर प्रेम करताता. तसेच, आपले मुख्यमंत्री मोदींसोबत काम करणारे असले, तर विकासाला वेग येतो. मोठ्या योजना राबवल्या जातात’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

‘जनतेले पाहिलं आहे की, ज्या ठिकाणी दुसरे मुख्यमंत्री आले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना रोखल्या आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकारचे काम कर्नाटकातील लोकांनी पाहिलं आहे. त्यामुळे निश्चितच भाजपाला लोक बहुमताने निवडून देतील’, असेही फडणवीस म्हणाले.

आमचा एक्झिट पोल हा लोकांच्या मनातला असतो – फडणवीस

‘एजन्सी सर्वे करत असतात. आमचा एक्झिट पोल हा लोकांच्या मनातला असतो. लोकांच्या मनातली केमेस्ट्री मला सांगते की आम्हाला मोदी आणि भाजपा सोबत जायचं आहे. त्यामुळे बोम्मईंचे सरकार पुन्हा निवडून येणार आहे. एक्झिट पोलबाबत बोलायचं झालं तर, भाजपा असा पक्ष आहे की, वारंवार एक्झिट पोलचे आकडेवारी खोटं ठरवतं’, असे फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने ठाकरे गटाचा बारसू प्रकल्पाला विरोध”, उदय सामंतांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -