घरताज्या घडामोडीकोरोनाबाधित पत्रकारांना भाजप सर्वतोपरी मदत करेल - चंद्रकांत पाटील

कोरोनाबाधित पत्रकारांना भाजप सर्वतोपरी मदत करेल – चंद्रकांत पाटील

Subscribe

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. चंद्रकांतदादा पाटील यांचं आश्वासन

मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या पत्रकारांना घरातून काम करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिन्यांच्या मालकांनी व संपादकांनी परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारने सूचना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – CoronaVirus: सावधान! मुंबईत प्रसारमाध्यमातील ५३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. त्यातही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना ही कोरोना संक्रमण होणं, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्ष पत्रकारांच्या पाठिशी उभे असून, कोरोना संक्रमित पत्रकारांना पक्षाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करु, असे त्यांनी आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले की, “इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचा वार्ताहर, छायाचित्रकार हे थेट कोरोनाबाधितांशी थेट भिडत असतात. त्यामुळे मुंबईत कोरोना संक्रमणामुळे जे पत्रकार रुग्णालयात दाखल झाले आहेत. अशा पत्रकारांना त्यांच्या मालकांनी त्यांचा पुढील तीन महिन्यांचा पगार द्यावा, यासाठी सरकारने त्यांना सूचित करावे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या मालकांनी पगार देण्यासाठी असमर्थता दर्शविल्यास भाजप यासाठी पुढाकार घेईल.

पत्रकारांना कोरोना हे धक्कादायक – प्रकाश जावडेकर

केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना झालेल्या कोरोना संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत पत्रकारांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. “५० हून अधीक पत्रकारांना कोरोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे. पत्रकारांनी योग्य ती काळजी घ्यावी,” असं ट्विट केलं आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -