कर्नाटकातून बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचं भाकीत

bjp will lose in karnataka bommai will go from power said sharad pawar on karnatak election

काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार फोडून सत्ता स्थापन केलेल्या कर्नाटकमध्ये बोम्मईंच सत्ता पुढील निवडणुकीत जाणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे.

यावेळी कर्नाटकच्या आगामी निवडणुकीवरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं. आगामी राज्यांच्या निवडणुकांत कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही, असं स्पष्ट भाकीत पवारांनी केलं. यावर ते पुढे म्हणाले की,
यावेळी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरु आहेत. परंतु सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे स्थानिक प्रश्न आहेत ज्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही, असं चित्र सर्व्हेतून दिसत आहे. तो सर्व मी वाचला. आता जे सत्ताधारी आहेत. त्यांच्याविरोधात देशात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असे वाटत नाही. यापूर्वाचे सर्व्हे पाहिले. पाच ते दहा वर्षांपूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत. या एजन्सीने एकप्रकारे ही दिशा दाखवली आगे. ही दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची आहे असं वाटत नाही, असही पवार म्हणाले.

ते पुढे असं म्हणाले की, या सर्व्हेतून देशात काँग्रेसचे आकडे वाढतील, असं स्पष्ट दिसतयं. कर्नाटकात भाजपचे राज्य राहणार नाही. तिथे परिवर्तन करण्यास लोकं उत्सुक आहेत, असं स्पष्ट चित्र आहे. पण उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे, त्याची आकडेवारी आलेली नाही.

दरम्यान आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक एकत्र घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावर शरद पवार म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असं काही लोकांचं मत आहे. पण त्याची विश्वासार्ह माहिती माझ्याकडे नाही, असंही शरद पवार म्हणाले. तसेच काही सर्व्हेंच्या जमनत चाचणीवरही त्यांची स्पष्ट भाष्य केलं आहे.