घरमहाराष्ट्र'शिंदेंनी लोकसभेच्या 5 जागा लढवल्या तरी खूप झालं'; राऊतांची खोचक टीका

‘शिंदेंनी लोकसभेच्या 5 जागा लढवल्या तरी खूप झालं’; राऊतांची खोचक टीका

Subscribe

सत्ताधारी पक्ष भाजप-शिवसेना यांच्यातही जागा वाटपाच गणित ठरल्याचं दिसून येतयं. यावर भाष्य करताना आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मिष्कील टिप्पणी केली आहे. राऊत म्हणाले की, शिंदे गटाने 5 जागा लढवल्या तरी खूप झालं, असं म्हणत खोचक टीका केली आहे.

मागच्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाटपावरुन राजकीय पक्षांमध्ये बैठका घेतल्या जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. कोण किती जागा लढवणार याची गणित ठरू लागली आहेत. त्यातच सत्ताधारी पक्ष भाजप-शिवसेना यांच्यातही जागा वाटपाच गणित ठरल्याचं दिसून येतयं. यावर भाष्य करताना आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मिष्कील टिप्पणी केली आहे. राऊत म्हणाले की, शिंदे गटाने 5 जागा लढवल्या तरी खूप झालं, असं म्हणत खोचक टीका केली आहे. ( BJP will not give 5 seasts of Loksabha to Eknath Shinde group shivsena )

शिंदे गटाला मी पक्ष मानतच नाही

कोण शिंदे-मिंधे गट? मी पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. तो गट म्हणजे भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात तसं आहे. कधीही कोंबड्या कापल्या जातील. बोलायला सकाळ, संध्याकाळ कोंबड्या- कोंबडे आरवत असतात तसं ते करत आहेत. या कोंबड्या सध्या फडफड करत आहेत. त्यांच्या मानेवर कधीही सुरी फिरवली जाईल. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय विचारधारा आहे? काय बैठक आहे? निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून पक्ष होत नाही. शिंदे गटाने 48 जागा लढवाव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

तसचं, शिंदे गट आणि भाजपचं जागा वाटप झालं आहे. शिंदे गटाने 22 जागा मागितल्याचं बोललं जात आहे. यावरही राऊतांनी खोचक उत्तर दिलं आहे. 5 जागा शिंदेंना भाजपने दिल्या तरी खूप झालं, असं ते यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: ‘मी आणि फक्त मीच’ हे मोदींचे धोरण, हा अहंकार लोकशाहीला घातक ; सामनातून पंतप्रधानांवर हल्लाबोल )

- Advertisement -

आम्ही 19 जागा लढवणारच- राऊत ठाम 

तसचं, 2019 ला आमच्या 19 जागा होत्या. त्या 19 जागा कायम राहणार असल्याचंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत असतो. त्यामुळे माझ्या या वक्तव्यावर कोणी टीका केली तर मला फरक पडत नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -