Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भाजपा पंचांग पाहून करणार उमेदवारांची निवड? यूपीनंतर आता 'या' राज्यातही प्रयोग

भाजपा पंचांग पाहून करणार उमेदवारांची निवड? यूपीनंतर आता ‘या’ राज्यातही प्रयोग

Subscribe

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करताना पक्षाकडून अनेक गोष्टींचा विचार केला जातो. उमेदवाराचा जनसंपर्क, त्याची निवडून येण्याची शक्यता, संघटन कौशल्य अशा अनेक पाहिल्या जातात. मात्र एका वृत्तपत्राच्या दाव्यानुसार उमेदवार निवडून येणार की नाही, यासाठी त्या उमेदवाराचे भाग्य भाजपा (BJP) ज्योतिषांकडून पाहत असल्याचे म्हटले आहे. यानंतर उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला तर त्याने आपल्या नशीबाला दोष देऊ नये, यासाठी भाजपाकडून तोडगा काढण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. (BJP will select candidates by looking at almanac After UP now experiment in this state too)

हेही वाचा – ‘इंडिया’ नावाला टींब लावून विरोधकांच्या आघाडीने दुष्कृत्य केलं; भाजपाकडून मुंबईतील बैठकीवर हल्लाबोल

- Advertisement -

वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, भाजपा पक्ष उमेदवाराचं नशीब काय सांगते? त्यांचा निवडणुकीत जिंकून येण्याचा योग आहे का? हे सर्व ज्योतिषांकडून पाहिलं जाणार आहे. उमेदवाराला तिकीट देण्याआधी भाजपा उमेदवाराचे पंचाग पाहणार आहे. त्यामुळे उमेदवाराला आता निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यास त्याला आपल्या नशीबाला दोष देता येणार आहे.  छत्तीसगढमध्ये भाजपा याच पद्धतीचा वापर करत असल्याचे एका वृत्तपत्राने भाजपामधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये प्रयोग यशस्वी

भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, पंचाग पाहून उमेदवाराची निवड करण्याचा प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी झाला होता. त्यामुळे आता छत्तीसगडमध्येही असाच प्रयोग केला जाणार आहे. पक्षाकडून विभागासाठी तीन उमेदवारांचे नाव निश्चित झाल्यानंतर ज्योतिषाकडून या उमेदवारांचे गृह-नक्षत्र पाहिले जातील. ज्या उमेदवाराचा जिंकण्याचा योग जास्त असेल त्यालाच तिकीट दिले जाईल. विशेष म्हणजे पंचांग पाहण्यासाठी उत्तर प्रदेशमधून छत्तीसगडमध्ये ज्योतिषी आणण्यात आले आहेत, अशी माहितीही भाजपामधील सूत्राने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : इंडिया आघाडीची ताकद बघून चीनही मागे हटेल; संजय राऊतांना विश्वास

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी वृत्त फेटाळले

वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, छत्तीसगडमधील नेत्यांनी पहिल्या यादीनंतर 56 उमेदवारांची दुसरी यादी दिल्लीला पाठवली आहे. त्यातील 30 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांनी हे वृत्त फेटाळले आहे. त्यांनी सांगितले की, उमेदवाराची निवड करण्यासाठी गृह-नक्षत्र असं काही पाहिलं जात नाही. उमेदवारांकडून त्यांची माहिती घेतली जाते आणि त्यानंतर निवड केली जाते, असे अरुण साव म्हणाले.

- Advertisment -