घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरहिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Subscribe

भाजप आणि एआयएमआयएम यांच्यात गुप्त बैठका सुरु असून ते राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

BJP’s conspiracy to create riots between Hindus and Muslims | येत्या काळात महाराष्ट्रात हिंदू – मुस्लिम दंगली घडवण्याचा भारतीय जनता पक्षाचा कट आहे. भाजप आणि एआयएमआयएम यांच्या गुप्त बैठका होत आहेत. या दोन्ही पक्षांनी मिळून हिंदू-मुस्लिम दंगल घडवण्याचा कट रचला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (opposition leader Ambadas Danve) यांनी केला आहे.

मी कोणाच्याही संपर्कात नाही, शिंदे गटाचेच लोक माझ्या संपर्कात 
अंबादास दानवे हे एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांच्या संपर्कात असल्याची चर्चा ही विरोधक अस्वस्थ असल्याचे लक्षण असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दावा केला होता, की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे हे लवकरच शिंदे गटात दाखल होणार आहेत. ते तिकडे अस्वस्थ आहेत. काना मागून आलेल्या सुषमा अंधारे या जास्त तिखट झाल्या असल्यामुळे शिवसेनेतील अनेक नेते अस्वस्थ असून दानवे हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले होते. यासंबंधी अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी शिरसाटांचा दावा सपशेल फेटाळला आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकेर यांची खेड येथे झालेली सभा, ही जनता शिवसेनेसोबत असल्याचे सांगण्यासाठी पुरेसी असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे. येत्या ८-९ एप्रिलला एकनाथ शिंदेंची धनुष्यबाण यात्रा संभाजीनगर मधून सुरु होणार आहे, यावर दानवे म्हणाले, की त्याआधी २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होणार आहे. शिंदेच्या सभेला किती लोक येतात आणि ते कुठून-कुठून घेऊन येतात, ते पाहूया, असेही अंबादास दानवे म्हणाले.

गद्दार सध्या अस्वस्थ 
दानवे म्हणाले, आमच्यातून गेलेले गद्दार सध्या अस्वस्थ आहेत. मी कोणाच्याही संपर्कात नाही. माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. किंवा मी कोणाशीही संपर्क केलेला नाही. विधिमंडळात सर्वांच्याच भेटी होतात. संजय शिरसाट यांच्यासोबत विधिमंडळात नमस्कार – चमत्कार झाला तेवढचं. शिंदे गटातीलच लोक माझ्या संपर्कात आहेत, मात्र मी त्यांच्यासारखे दावे करत नाही. विरोधकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. ती त्यांना बोलून दाखवता येत नाही, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर ती तुम्हाला स्पष्ट दिसू शकते. सुषमा अंधारे (Shushma Andhare) या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्या राज्यात फिरत असतात, त्यांचात आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा किंवा बेबनाव नाही, असेही स्पष्टीकरण दानवे यांनी दिले.

- Advertisement -

राज्यात दंगल घडवण्याचा भाजपचा कट 
राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरत आहे. जनतेला सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही, मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना तातडीची मदत या सरकारने केलेली नाही. जनतेमध्ये सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडे कोणतेही उत्तर नाही, त्यामुळे आता भाजप राज्यात दंगली घडवण्याचा कट रचत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांच्यात गुप्त बैठक झाली असून राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा कट असल्याचा आरोप विरोधी पभनेत्यांनी केला आहे. दोन समाजात दंगल घडवून त्याचा राजकीय फायदा भाजपला घ्यायचा आहे, असे दानवे म्हणाले आहेत.
मी या संदर्भात ज्या, ज्या यंत्रणा आहेत त्यांना या संबंधीची माहिती दिली आहे. भाजप आणि एमएआयएम यांच्यात लागेबांधे आहेत, त्यातूनच हा कट रचण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर ठरणार राजकारणाचे केंद्र; मविआच्या सभे पाठोपाठ शिंदेंची धनुष्यबाण यात्रा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -