महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण, विधानपरिषदेच्या लॉबिंगला लागला ब्रेक

BJP's Devendra Fadnavis, Congress' Sonia Gandhi and KC Venugopal contracted corona

राज्यात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीची प्रक्रिया सुरू आहेत. मात्र, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीतील इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे. या निवडणूकीच्या प्रक्रियेतील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लगण झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांना कोरोनाने गाठले आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठीचे लॉबिंग बंद झाले आहे. त्यामुळे ईच्छुकांची पंचाईत झाली असून हे नेते यादी जाहीर होण्याची वाट बघण्यापलीकडे काही करू शकत नाहीत.

काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी बंद –

भाजपचे विरोधी पक्षनेते आणि ज्यांचा शब्द राज्यातील भाजपचे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे ते देवेंद्र फडणवीस कोरोनाग्रस्त आहेत. काँग्रसमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल हे देखील कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे लॉबिंगसाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी बंद झाली आहे.

राज्यसभा निवडणूकीवर कोरोनाचे सावट –

राज्यात बऱ्याच वर्षानंतर राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दहा तारखेच्या मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, त्याआधी विधान परिषदेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद पण मतदानाद्वारे होणार की बिनविरोध याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपचे 4 येतात तर 5व्या जागेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महाविकास आघाडीचे पाच आमदार निवडून येतात. त्यांना 6 व्या जागेसाठी मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मतदानासाठी रस्सीखेच आहे. मात्र, उमेदवारांच्या निवडीवर कोरोनाचे सावट आहे.