घरमहाराष्ट्रशिंदे समर्थक शिलेदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, महेश तपासेंचे आरोप

शिंदे समर्थक शिलेदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, महेश तपासेंचे आरोप

Subscribe

शिवसेनेशी गद्दारी करुन भाजपसोबत संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे व त्यांच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर भाजपची वक्रदृष्टी पडली असल्याने ही धुसफूस वाढत जाणार आहे शिवाय शिवसेना सोडून चूक केली असा पश्चाताप त्या आमदारांना करावा लागणार आहे असा दावाही महेश तपासे यांनी केला.

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे म्हणूनच एकनाथ शिंदेवर भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

ओवळा माजिवाडा मतदारसंघ बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचा आहे मात्र हा आणि इतर दोन मतदारसंघ भाजपला हवे असून त्यादृष्टीने भाजप रणनीती आखत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

मध्यंतरी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या तिन्ही मतदारसंघात भाजपचे मेळावे घेतले होते त्याचवेळी कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप डोळा ठेवल्याचे बातम्या आल्या होत्या. आता ओवळा माजिवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ हे तिन्ही मतदारसंघ भाजपला हवे असून त्यात प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघाची डील झाल्याने एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांच्यात धुसफूस झाल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत असेही महेश तपासे म्हणाले.

शिवसेनेशी गद्दारी करुन भाजपसोबत संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे व त्यांच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर भाजपची वक्रदृष्टी पडली असल्याने ही धुसफूस वाढत जाणार आहे शिवाय शिवसेना सोडून चूक केली असा पश्चाताप त्या आमदारांना करावा लागणार आहे असा दावाही महेश तपासे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -