घरमहाराष्ट्रनाशिक'बारामती पॅटर्न' चा अभ्यास करणे हा भाजपचा छुपा अजेंडा

‘बारामती पॅटर्न’ चा अभ्यास करणे हा भाजपचा छुपा अजेंडा

Subscribe

निर्मला सितारामन यांच्या नियुक्तीवर जयंत पाटील यांचा टोला

नाशिक : प्रत्येक अर्थमंत्र्याला आपल्याही मतदारसंघात आदर्श विकासकामे व्हावीत अशी इच्छा असते. कधी कधी काय करावं हे कळत नाही. त्यामुळे बारामती मतदारसंघातील आदर्श कामांचा अभ्यास करणं हाच भाजपचा छुपा अजेंडा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निर्मला सितारामन यांच्या बारामतीच्या निरीक्षकपदी नियुक्तीवर टोला लगावला ते आज नाशिक येथे बोलत होते.

हे तर शिंदे . फडणवीस सरकारचे अपयश

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून जाण्यामागे सर्वस्वी जबाबदारी शिंदे सरकारची आहे. शिंदे सरकार येण्याआधी मविआ सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी वेदांतासोबत अनेकदा चर्चा केली. ३९ हजार कोटी रूपयांच्या सवलती तत्कालीन सरकारने देऊ केल्या. महाराष्ट्रासोबत गुजरात राज्य स्पर्धेत होते. त्यांनी २७ हजार कोटी रूपयांच्या सवलती देऊ केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एमओयुसाठी या असे पत्र पाठवलेले आहे. आमच्या काळात जर उशिर झाला असे म्हणता मग शिंदेंनी पत्र का दिले ? पण आज तो प्रकल्प गुजरातला गेला. आमच्या सरकारवर आरोप करतांना राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनिल अग्रवालांना जाऊन भेटले का ? पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली ? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीश्वरांची नाराजी नको म्हणून आता हे दोघे अग्रवाल यांना भेटायलाही घाबरताहेत असा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले जयंत पाटील
  • आगामी निवडणूकांतील आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा.
  • निवडणूका एकत्रित लढवाव्यात असा आमचा प्रयत्न असेल.
  • शिंदे सरकार अस्थिर
  • ४० आमदारांवर कधीही अपात्रतेची कारवाई होउ शकते
  • भाजपला उपमुख्यमंत्रीपद दिल्याने भाजपांतर्गत प्रचंड नाराजी आहे
  • शिंदे गटातील प्रत्येकालाच मंत्री व्हायचय त्यामुळे शिंदेंची मोठी कसरत होतेय.
  • आदित्य ठाकरेंच्या सभांमुळे शिंदेंच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
  • शिंदे गटातील अनेकजण संपर्कात आहेत.
  • राज्यात भाजपला शरद पवारांची सर्वाधिक भिती आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -