भाजपचेनेते संकटमोचक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. याच दरम्यान जामनरे मतदारसंघातून आठव्या फेरीअखेर गिरीश महाजन ९५११ मतदांनी आघाडीवर आहेत.
महाजन यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे शदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोपडे यांच्याशी आहे. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने महाजन यांच्या स्वकियांशी होत असलेल्या लढतीकडे लक्ष लागले आहे. महाजन यांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला. खोपडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार, आमदार एकनाथ खडसे यांच्या सभा तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड शो झाला होता.