घरमहाराष्ट्रVIDEO: ठिंबक सिंचनाच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या काळविटांची सुखरुप सुटका

VIDEO: ठिंबक सिंचनाच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या काळविटांची सुखरुप सुटका

Subscribe

शेतातील ठिबक सिंचन योजनेच्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये दोन काळविटांची शिंगे अडकली. दोन तरुणांनी या काळविटांची सुटका करण्यात आली आहे.

अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अहमदनगरमध्ये पाण्याच्या शोधात शेतात आलेले दोन काळवीट ठिंबक सिंचन योजनेच्या पाइपलाईनमध्ये अडकले. बऱ्याच वेळापासून ते सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. इकडे तिकडे पळत होते. दरम्यान त्याठिकाणावरुन जाणाऱ्या दोन तरुणांनी या काळविटांची सुटका केली आहे.

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील थेरगाव येथे ही घटना घडली आहे. एका शेतात पाण्याच्या शोधासाठी दोन काळवीट आले होते. शेतातील ठिबक सिंचन योजनेच्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये त्यांची शिंगे अडकली. त्यामु‌ळे काळवीट तेथेच अडकून पडले. बराच प्रयत्न करूनही त्यांना सुटका करून घेता येत नव्हती. त्यावेळी तेथे आलेल्या दोन तरुणांनी मोठ्या कसरतीने त्यांना पकडून शिंगांत अडकलेले पाईप काढले आणि त्यांनी काळविटांची सुखरुप सुटका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -