Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Black Fungus: जीवघेण्या बुरशीमुळे ६ महिने बेडवर, १३ सर्जरीनंतर काढावे लागले तरुणाचे...

Black Fungus: जीवघेण्या बुरशीमुळे ६ महिने बेडवर, १३ सर्जरीनंतर काढावे लागले तरुणाचे डोळे

६ महिने नवीनवर उपचार सुरु असताना १. ४८ करोड रुपये खर्च करण्यात आला

Related Story

- Advertisement -

कोरोना नंतर होणाऱ्या जीवघेण्या म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीच्या आजारामुळे आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. अनेकांनी या आजारात आपले डोळे, जबडा गमावला आहे. अनेक जण आजही आर्टिफिशीअल डोळे आणि जबड्यांच्या शोधात आहेत. काळ्या बुरशीच्या जिवघेण्या आजाराच्या अनेक कहाण्या आजवर आपण ऐकल्या आहेत. विदर्भात राहणाऱ्या नवीन पाल या ४६ वर्षीय तरुणाच्या १३ सर्जरीनंतरही त्याचे डोळे काढावे लागले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवीनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला काळ्या बुरशीचे संक्रमण झाले. त्यानंतर पुढील सहा महिने नवीन रुग्णालयात उपचार घेत होता. सहा महिन्यांच्या उपचारात नवीनवर १३ सर्जरी करण्यात आल्या. इतक्या सर्जरी करुन देखील नवीनला आपले डोळे गमवावे लागले. नवीनच्या या कहाणीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Black Fungus: Young man had to have his eyes removed after 6 months in bed due to mucormycosis Black fungus)

६ महिने नवीनवर उपचार सुरु असताना १. ४८ करोड रुपये खर्च करण्यात आला. नवीनची पत्नी रेल्वेमध्ये काम करत असल्याने नवीनच्या आजारात त्यांना रेल्वेकडूनही मदत मिळाली. नवीनची पत्नी कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या सहाय्याने नवीनच्या उपचारांसाठी ४८ लाख रुपये जमा केले. इतके करुनही शेवटी नवीनला आपले डोळे काळ्या बुरशीच्या जीवघेण्या आजारामुळे गमवावे लागले. काळ्या बुरशीने मला आयुष्यभरासाठी जखमा दिल्यात त्या मी कधीच विसरु शकत नाही,अशा भावना नवीनने व्यक्त केल्यात.

- Advertisement -

अशीच कहाणी यवतमाळमधील निलेश बेंडेच्या बाबतीत समोर आली. निलेशला मार्च २०२१मध्ये कोरोना संसर्ग झाला. कोरोनातून बाहेर येताच त्याला काळ्या बुरशीने गाठले. त्याला यवतमाळच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा एक डोळा काढण्यात आला. त्यानंतर १० दिवसांनी त्यांचा दुसरा डोळा देखील काढण्यात आला. दोन्ही डोळे गमावल्या नंतर निलेश पूर्णपणे खचून गेला होते असे त्यांच्या पत्नीने सांगितले. निलेश एका ठिकाणी प्रायव्हेट सिक्युरिटमध्ये काम करत होता. दोन्ही डोळे गमावल्यामुळे त्यांची नोकरीही त्यांना सोडावी लागली. त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आत त्यांच्या पत्नीवर आहे.

अकोल्यातही अजय शिंपिकर आणि सुबोध कासुलकर यांना काळ्या बुरशीची लागण झाल्यानंतर त्यांचा जबडा काढण्यात आला. त्यांना आता त्यांच्या नॉर्मल लुकसाठी रिकन्सट्रक्टिव सर्जरी करावी लागणार आहे. अशा अनेक घटना संपूर्ण राज्यासह देशभरातून समोर येत आहे. प्रत्येक घटना ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.


- Advertisement -

हेही वाचा – केईएममध्ये ग्लोव्हज, सिरींजचा तुटवडा; ग्लोव्हजच्या पुनर्वापरामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता

 

 

 

- Advertisement -